Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 : आमदार प्रा राम शिंदेंना उमेदवारी जाहीर होताच कर्जत जामखेडमध्ये भूमिपुत्रांकडून जल्लोष !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 : राज्याचे माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde BJP) यांना भारतीय जनता पक्षाने कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदारकीचे तिकीट बहाल केले आहे. आमदार शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच कर्जत-जामखेड मतदारसंघातील भूमिपुत्रांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला.
भाजपने रविवारी राज्यातील ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा.राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार शिंदे यांचे तिकीट जाहीर होताच कर्जत-जामखेड मतदारसंघातील भूमिपुत्रांनी ऐकमेकांना पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केला. आमदार प्रा.राम शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी भूमिपुत्रांनी केला.
यावेळी मनोज काका कुलकर्णी, भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शहराध्यक्ष पवनराजे राळेभात, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, डाॅ अल्ताफ शेख, संजय काका काशिद, संतोष गव्हाळे, मोहनमामा गडदे, सलिम तांबोळी, सुनिल यादव, संजय राऊत, तुषार बोथरा, सलिम बागवान, अशोक मोरे, विनोद बेलेकर, शिवकुमार डोंगरे, सतिश भैलूमे, उमेश जपे, राहूल गदादे, रामराजे जागीरदार, सुभाष खरात, उमेश चावरे, अक्षय क्षीरसागर, प्रेम राऊत, गणेश राऊत, सतिश पठाडे, यश बोरा सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.