Ashatai Ram Shinde : “तयार रहो ये बाहरवालो, आ रहे है राम !” माजी सभापती आशाताई शिंदेंची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी ९९ जागांवरील उमेदवार जाहीर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde BJP) यांना भाजपने कर्जत-जामखेड मतदारसंघातून सलग चौथ्यांदा रिंगणात उतरवले आहे. आमदार राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या पत्नी तथा जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे (Ashatai Ram Shinde) यांनी इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट मतदारसंघात चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.(Instagram post)

आमदार प्रा राम शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच रोहित पवारांनी ‘है तय्यार हम’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून आशाताई शिंदे यांनी ‘तयार रहो ये बाहरवालो, आ रहे है राम ! भूमिपुत्राचा विजय निश्चित आहे’ अशी दोन ओळींची खणखणीत पोस्ट लिहीत चांगलाच धुराळा उडवून दिला आहे. आशाताई शिंदे यांनी ‘तयार रहो ये बहरवालो’ म्हणत पहिल्यांदा विरोधकांवर थेट निशाणा साधत भूमिपुत्राचा विजय निश्चित असल्याचा इशारा दिला आहे. आशाताई शिंदे यांच्या या पोस्टची मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे.

माजी सभापती आशाताई शिंदे ह्या गेल्या काही महिन्यांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाच्या झंझावाती दौर्यावर आहेत. त्यांच्या दौर्याला सर्वसामान्य जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या मनाचा ठाव घेणारी त्यांची भाषणशैली अनेकांना भावत आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी आजवर मतदारसंघात केलेली विकास कामे तसेच महायुती सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती त्या या दौऱ्यात जनतेला देत आहेत. महिला वर्गाकडून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. सर्व घटकांशी त्या संवाद साधत आहेत. त्यांच्या झंझावाती दौऱ्याची मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.
इन्स्टाग्राम वर टाकलेल्या एका खणखणीत पोस्टमुळे आशाताई शिंदे ह्या मतदारसंघात चर्चेत आल्या आहेत. ‘तयार रहो ये बाहरवाले, आ रहे है राम, भूमिपुत्राचाच विजय निश्चित आहे’ अशी पोस्ट टाकत रोहित पवारांना खणखणीत इशारा दिलाय. या पोस्टमुळे विरोधकांच्या पोटात मोठा गोळा आल्याचे बोलले जात आहे. कारण ‘है तयार हम’ या पोस्टला ज्या स्टाईलने आशाताईंनी उत्तर दिलेय ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आशाताई शिंदे यांनी मतदारसंघाची हवा भूमिपुत्राच्याच दिशेने वाहत आहे, हेच इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमांतून सुचवल्याचे दिसत आहे. आशाताई शिंदे ह्यांची ही पोस्ट मतदारसंघात जोरदार चर्चेत आली आहे.