भारतीय पत्रकारितेचा जादूई आवाज हरपला : नामवंत पत्रकार कमाल खान यांचं निधन | Senior journalist Kamal Khan passed away

उत्तर प्रदेश । Senior journalist Kamal Khan passed away : भारतीय हिन्दी पत्रकारितेतील प्रसिध्द पत्रकार कमाल खान यांचं आज निधन झालं, हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने कमाल खान यांचं लखनौमध्ये निधन झालं. मृत्युसमयी ते 62 वर्षांचे होते.

जेष्ठ पत्रकार कमाल खान यांना घरी हृदयविकाराचा झटका आला होता. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतू डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Senior journalist Kamal Khan passed away)

कमाल खान हे NDTV या वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. लखनौ येथून ते पत्रकारिता करत होते. आपल्या आगळ्या वेगळ्या रिपोर्टींग शैलीसाठी ते भारतासह जगभर प्रसिद्ध होते. त्यांच्या आवाजात कुठल्याही विषयाच्या बातमीची मांडणी पत्रकारितेला नव्या उंचीवर घेऊन जायची.

कमाल खान यांचा जन्म 1960 सालचा. त्यांनी केलेली अनेक वार्तांकने देशभर चर्चेत राहिली. जवळपास तीन दशकांपासून ते पत्रकारितेत सक्रीय होते. उत्तर भारतातील पत्रकारितेचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांना ओळखले जायचे.

अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी, विविध कंगोरे टिपण्याची त्यांची शैली नेहमी चर्चेत असायची. त्याचबरोबर गंगा जमूनी तहजिबचं ते चालतं बोलतं विद्यापीठ होतं. पत्रकारितेत स्थानिक भाषांचा ते खुबीने वापर करायचे.

जेष्ठ पत्रकार कमाल खान यांच्या अचानक निधनामुळे देशभर शोककळा पसरली आहे. विशेषता: पत्रकारिता क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. कमाल खान यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.