PM Narendra Modi’s big announcement Corona vaccine booster dose in india | पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा : 15 वर्षांवरील मुलांना दिली जाणार कोरोना लस, बुस्टर डोसही देण्याचा निर्णय

PM Narendra Modi’s big announcement Corona vaccine booster dose in india |जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला लसीकरणासंबंधी मोठी घोषणा केली. तसेच देशात ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी देशवासियांनी एकजुटीने लढाई लढण्याची अवाहन केले.

भारतात लहान मुलांचे कोरोना लसीकरण कधी होणार ? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधानांनी लहान मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोस यासंबंधी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता बुस्टर डोसचाही मार्ग मोकळा झाला आहे. देशात आता कोरोना लशीचा बुस्टर डोसही दिला जाणार आहे. (PM Narendra modi live)

जगातील काही देशांमध्ये कोरोना लशीचा बुस्टर डोस दिला जातो आहे. भारतात याची फक्त चर्चा होत होती. अखेर भारतातही बुस्टर डोस मिळणार हे पक्कं झालं आहे. काही विशिष्ट लोकांनाच बुस्टर डोस देणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे. (Corona vaccine booster dose in india)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोना लढाईत देशाला सुरक्षित ठेवण्यात कोरोना योद्धा, हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचं खूप मोठं योगदान आहे. आजही ते कोरोना रुग्णांच्या सेवेत आपला वेळ देत आहेत.त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने त्यांना प्रिकॉशन डोस (Precaution Dose) देण्याचा निर्णय घेतला आहे.

10 जानेवारी, 2022 सोमवारपासून बुस्टर डोस द्यायला सुरुवात केली जाणार आहे. 60 वर्षांपेक्षा वरील नागरिक ज्यांना इतर आजार आहेत, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिकॉशन डोस देण्याचा पर्याय उपलब्ध असेल असंही मोदींनी सांगितलं. (Prime Minister Modi’s address to the nation)

भारतात अत्तापर्यंत 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे 15 वर्षांपासून मुलांना लस घेता येणार आहे. पुढील महिन्यात 3 जानेवारी 2021 या तारखेपासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केली.

देशात मागील 12 महिन्यांपासून लसीकरण अभियान सुरू आहे. सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतत काम करायचे आहे, असं आवाहनही मोदींनी यावेळी बोलताना केलं.