Big Breaking : Salman Khan gets snake bite Incident at Farmhouse in Panvel | बाॅलीवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बाॅलीवूड अभिनेता सलमान खान संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खान याला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली आहे. (Salman Khan gets snake bite Incident at Farmhouse in Panvel )

पनवेलमधील फार्महाऊसवर ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सलमान आला होता. त्याचवेळी सर्पदंशाची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने बाॅलीवूड मध्ये खळबळ उडवून दिली आहे.

शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. यानंतर त्याला पहाटे 3 .30 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. MGM हॉस्पिटलमध्ये तो दाखल होता. दरम्यान आता त्याला घरी सोडण्यात आलंय.

ख्रिसमस आणि बर्थडे सेलिब्रेशन

ख्रिसमस तसंच वाढदिवसानिमित्त सलमान खान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसह पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये शनिवारी आला होता. मध्यरात्री बाहेर पडल्यानंतर सर्पदंशाचा प्रकार घडला. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. या प्रकारानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याची प्रकृती ठीक असल्याचं समजतंय.

दरम्यान, सलमान खान 56 वर्षांचा होणार आहे. 27 डिसेंबर रोजी तो आपला 56वा वाढदिवस साजरा करणार आहे. कोरोनामुळे सलमान यावेळी फार जोरात वाढदिवस साजरा करणार नाहीये. एका रिपोर्टनुसार, यावेळी सलमानच्या वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी होणार आहे.

कोरोनामुळे साधेपणानं साजरा करणार वाढदिवस

सलमान खान त्याचा वाढदिवस पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र या पार्टीत सहभागी होणार आहेत. सलमानचा प्लॅन असा आहे, की तो खूप लोकांना आमंत्रित करणार नाही. तसं प्रत्येक वेळी सलमान खानच्या वाढदिवसाला पाहुण्यांची यादी खूप मोठी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सलमान आपला वाढदिवस साधेपणानं साजरा करतोय.