गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी 46 देशात धडकली राशीनच्या तरुणाची शांति यात्रा !

peace walk of Rashin's youth Nitin Sonawane in 46 countries to spread Gandhian ideas

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राशीन येथील एका तरूणामुळे कर्जत तालुका जगाच्या पाठीवर सध्या चर्चेत आला आहे. सन 2016 पासून राशीनचा तरूण महात्मा गांधींजींचा अहिंसा आणि शांततेचा संदेश घेऊन जगभर भ्रमंती करत आहे. आजवर जगातल्या 46 पेक्षा अधिक देशात या तरुणाची शांति यात्रा पोहचली आहे.पायी आणि सायकलवरून त्या तरुणाची ही यात्रा सुरू आहे. आता पुढील महिन्यात या शांति यात्रेचा समारोप होणार आहे. ही कहाणी आहे नितीन सोनवणे या तरुणाची.

कर्जत तालुक्यातील राशीन येथील नितिन सोनवणे हा तरूण अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सहा महिने नितीन याने इंजिनिअर म्ह्णून काम केले. पण गांधींजींबद्दल जाणून घेण्याच्या ओढीने त्याचे मन नौकरी जास्त काळ रमले नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधीची पुस्तके वाचण्यास त्याने सुरुवात केली. तो जास्तीत जास्त वाचन करत राहिला. हे करत असताना नितीनला पुण्यातील महात्मा गांधी स्मारक निधीचे कार्य समजले. नितिन या संस्थेशी 2015 साली जोडला गेला. त्याने स्वयंसेवी कार्यास झोकून दिले.

great indian festival sale 2021

गांधीजींचे विचार, स्वातंत्र्यपूर्व काळातील शांततेच्या मार्गाचा लढा, जगभरातील त्यांचे स्थान, आपल्या देशाबरोबरच परदेशातही होणारा त्यांचा अभ्यास, जगातील शालेय पुस्तकात गांधीजीबद्दल दिली गेलेली माहिती या सर्व गोष्टींमुळे गांधीजींना जवळून जाणून घेण्याची आवड निर्माण झालेल्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील नितिन सोनवणे या तरूणाने 18 नोव्हेंबर 2016 साली वर्धा येथील सेवाग्राम आश्रम येथून शांति यात्रेला सुरुवात केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अहिंसा आणि शांततेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी नितिनची ही शांति यात्रा जगाच्या प्रवासाला निघाली होती. गेली चार ते पाच वर्षांपासून नितीन जगाच्या पाठीवर गांधींचे विचार पेरत भ्रमंती करत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधींना भारताबरोबरच जगभरात आदराने पाहिले जाते. अनेक देशांमधील शाळा, महाविद्यालय याठिकाणी गांधीजींचा इतिहास, त्यांची शिकवण याची उत्तम माहिती दिली जाते. माझी शांती यात्रा सुरु असताना परदेशातील अनेक नागरिक माझ्याबरोबर शांति यात्रेत सहभागी झाले. अनेक, संस्था, शाळा, यांच्या भेटीगाठी माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता.पुढच्या महिन्यात माझा प्रवास संपणार आहे असे नितीनने सांगितले.

ऑफरचा धमाका सुरूय : ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2021

”महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी करण्यासाठी नितीनचा जगभरचा प्रवास हा पायी आणि सायकलवरून सुरू आहे. आजवर नितीनने 46 देशांचा प्रवास केला आहे. या प्रवासात त्याने थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, हाँगकाँग, मकाऊ, जपान (टोकियो ते हिरोशिमा), दक्षिण कोरिया, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास, अल साल्वाडोर, निकाराग्वा, कोस्टा रिका, पनामा, कोलंबिया, इक्वाडोर आणि पेरू या देशात प्रवास केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टांझानिया, रवांडा, युगांडा, केनिया, इथिओपिया, सुदान, इजिप्त, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, जॉर्जिया, तुर्की, सर्बिया येथून चालत सुरुवात केली.मॅसेडोनिया, अल्बेनिया, मॉन्टेनेग्रो, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान नंतर भारतातून दिल्लीवरून प्रवास सुरु आहे. 17 नोव्हेंबरला त्याच्या शांती यात्रेचा समारोप होणार आहे.

गांधी विचाराने झपाटलेल्या नितीन सोनवणे या तरुणाची शांती यात्रा जगाच्या पाठीवर चर्चेची ठरली आहे. नितीनच्या या यात्रेमुळे कर्जतचेही नाव जगाच्या पाठीवर झळकले आहे. गांधी विचाराची ताकद किती मजबूत आहे हेच यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.