Parambir Singh hides terrorist Ajmal Kasab’s phone। परमबीर सिंगने दहशतवादी अजमल कसाबचा फोन लपवला : माजी पोलिस अधिकाऱ्याचा खळबळजनक गौप्यस्फोट !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावर मुंबईतील एका निवृत्त एसपींनी एक खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Parambir Singh hides terrorist Ajmal Kasab’s phone Sensational revelation of former police officer)

26/11 दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडलेल्या अजमल कसाब (Terrorist Ajmal Kasab) याचा फोन परमबीर सिंग यांनी लपवल्याचा आरोप निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण (Retired ACP Shamsher Khan Pathan) यांनी केला आहे. पठाण यांनी केलेल्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. (Serious allegation on Param Bir Singh)

मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात शमशेर खान पठाण यांनी या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाइल फोन सापडल्याचे सांगितले होते. तो फोन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता.

दहशतवादी कसाब याला ज्या गिरगाव चौपाटीवर पकडलं होतं तेथे परमबीर सिंग हे सुद्धा आले होते. तेव्हा, परमबीर सिंग यांनी तो फोन आपल्या जवळ ठेवला. जो त्या प्रकरणाचे तपास अधिकारी रमेश महाले यांना द्यायला हवा होता, जेणेकरुन पाकिस्तानी हँडलर आणि इतर कुणी या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता का हे कळू शकले असते.

शमशेर पठाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी हे मोबाइल घेण्यासाठी परमबीर सिंग यांत्याकडे गेले असता परमबीर सिंग यांनी ‘कुठला मोबाइल, गेट आऊट’ म्हणत उत्तर दिलं होतं.

अजमल कसाब याने दहशतवादी हल्ल्यापूर्वी ज्या-ज्या लोकांशी भारतात संपर्क केला होता. त्या सर्वांना बोलावून परमबीर सिंग याने पैसे घेतले असतील असा आरोपही शमशेर पठाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखातीत केला.

शमशेर पठाण यांनी केलेल्या या नव्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पठाण यांनी केलेल्या आरोपांवर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.