KKR vs RR IPL 2021 | कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत घेतली चौथ्या स्थानी झेप

KKR vs RR IPL 2021 | मुंबई | आयपीएलच्या यंदाच्या पर्वात (IPL 2021) प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठीच्या शर्यतीत सर्वात पुढे असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 86 धावांनी मात करत मोठा विजय मिळवला प्लेऑफमध्ये जाण्याचं स्वप्न कोलकाता नाईट रायडर्स संघाने अजून बळकट केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले ( Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals to leap to fourth position)

प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 171 धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्स समोर ठेवले होते. केकेआरकडून शुभमन गिलने (Shubham Gil) अर्धशतक झळकावले होते.फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाला रोखण्याची जबाबदारी केकेआरच्या गोलंदाजांनी यशस्वीरित्या पार पाडल्याने केकेआरने राजस्थान रॉयल्सचा 87 धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सचा संघ जेमतेम 85 धावाच करू शकला. या विजयामुळे केकेआरने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली. नेट रन रेटमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या दिल्लीलाही केकेआरने मागे सोडले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजी

सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानने गोलंदाजी निवडली. त्यामुळे केकेआरचा संघ प्रथम फलंदाजीला आला. यावेळी केकेआरची सलामी जोडी व्यंकटेश अय्यर आणि शुभमनने उत्तम सुरुवात करुन दिली.पण 38 धावांवर अय्यर बाद झाल्यानंतर काही फलंदाज लवकर बाद झाले. ज्यानंतर राहुल त्रिपाठीने मात्र गिलसोबत सामना सांभाळला. दरम्यान सलामीवीर शुभमनने 44 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 56 धावा केल्या. तर त्रिपाठीने 21 धावांची साथ त्याला केली. त्यामुळे केकेआरने 171 धावांपर्यंत मजल मारली.

ढेपाळलेल्या फलंदाजीने राजस्थान रॉयल्स गारद

171 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या राजस्थान संघाची फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळली. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर पुढे सर्वच फलंदाज अगदी काही धावांत बाद झाले. 40 धावांच्या आत तर 7 फलंदाज तंबूत परतले होते. केवळ राहुल तेवतियाने 44 धावा केल्या पण तो बाद होताच राजस्थानचा संघ बाद झाला आणि 86 धावांनी केकेआरने दिमाखदार विजयी मिळवला. केकेआरकडून शिवम मावीने 4, लॉकी फर्ग्यूसनने 3 आणि वरुणसह शाकिबने प्रत्येकी 1 विकेट घेतली.. तर राजस्थानचा एक गडी धावचीत झाला.

 

web titel : KKR vs RR IPL 2021 | Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals to leap to fourth position