Traders Association | 10 लाख रुपयांची बॅग पळवणाऱ्यांना तातडीने अटक करा : पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांना व्यापारी बांधवांचे साकडे !

Traders Association | कर्जत | कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) आवारातून आडत व्यापारी (traders) रवींद्र कोठारी यांच्या मुलाकडून दोन आरोपीनी दहा लाख रुपयांची बॅग पळवून नेण्याची खळबळजनक घटना सोमवार, दि ४ रोजी घडली होती. याप्रकरणात सहभागी असलेल्या  आरोपींचे नावे कर्जत पोलीसांना सांगून देखील अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. कर्जत व्यापारी असोसिएशनच्या (Merchant Association) वतीने गुरुवारी  पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव (Deputy Superintendent of Police Annasaheb Jadhav) यांना निवेदन देत आरोपींना तातडीने अटक करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार दि ४ ऑक्टोबर रोजी कर्जतचे आडत व्यापारी रवींद्र कोठारी यांच्या मुलाकडून कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून रोख रक्कम १० लाख रुपये असणारी बॅग सोमनाथ विठ्ठल साळुंके आणि प्रमोद विजय आतार या दोघांनी हिसकावून पळवून नेली होती.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात दोन्ही इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही आरोपी कर्जत तालुक्यातील कोरेगांव येथील असून कर्जत पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. सदरच्या घटनेनंतर कर्जत शहरातील व्यापाऱ्यामध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वरील गुन्ह्याचा जलद तपास व्हावा आणि आरोपीना तात्काळ अटक करीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  कर्जत व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ( Arrest those who snatched bags worth Rs 10 lakh immediately Statement of traders Association to Deputy Superintendent of Police Annasaheb Jadhav )

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन भोज, उपाध्यक्ष प्रसाद शहा, सचिव बिभीषण खोसे, खजिनदार संजय काकडे, गोविंद भणगे, सचिन कुलथे, दीपक शहाणे, महावीर बोरा, अतुल कुलथे, रवींद्र कोठारी, प्रफ्फुल नेवसे, जकी सय्यद, संतोष भंडारी, विशाल छाजेड, विक्रम गदादे, रोहित तोरडमल आदी व्यापारी उपस्थित होते.

 

web titel : Traders Association | Arrest those who snatched bags worth Rs 10 lakh immediately Statement of traders Association to Deputy Superintendent of Police Annasaheb Jadhav