Kangana Ranaut Controversial statement | कंगणा रणौत पुन्हा बरळली : म्हणे 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती..
दिल्ली : Kangana Ranaut Controversial statement वादग्रस्त वक्तव्य करुन कायमच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Bollywood actress Kangana Ranaut) पुन्हा एकदा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. देशाला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने बेताल वक्तव्य केलं आहे.आता तिच्यावर देशभरात जोरदार टीका होत आहे. सोशल मिडीयावर तर कंगणाविरोधात टीकेची झोड उडाली आहे.
‘टाइम्स नाऊ’च्या समिट 2021( Times Now Summit 2021) या कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली आहे की, ‘स्वातंत्र्य जर भिकेत मिळेल, तर ते स्वातंत्र असू शकत का? 1947 साली मिळालेलं स्वातंत्र… ही भीक होती, खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं’, असं वादग्रस्त विधान तिने केलं आहे.
या कार्यक्रमात कंगणा म्हणाली की, ‘सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर यांना माहित होत. रक्त वाहणार. मात्र हे ही लक्षात असुद्या, हिंदुस्थान्यांनी हिंदुस्थानींचे रक्त वाहू देऊ नये. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हते, ती भीक होती. स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले.’
कंगनाच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमची संचालिका नाविका कुमार म्हणाली की, यामुळेच सगळे तू भगवा असल्याचे म्हणतात. यावर कंगणा म्हणते की, आता यानंतर माझ्यावर आणखीन 10 गुन्हे दाखल होणार आहे. मग नाविका म्हणते, आता तर तू दिल्लीत आहेस. त्यावर कंगना म्हणते, मात्र जायचं तर घरीच आहे.
कंगनाच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात उपस्थित काही लोक टाळ्या वाजू लागले. हा व्हिडीओ पाहून बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर चांगलीच संतापली आहे. या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देत ती म्हणाली की, ‘हे ऐकून टाळ्या वाजवणारे ते कोण मूर्ख लोक आहेत, हे मला जाणून घ्यायचे आहे.’
युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी (Youth Congress President Srinivas B.V) यांनीही कंगना राणौतच्या वक्तव्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. अशा लोकांना पद्मश्री (PadmaShri) देणार्या मोदींनी उत्तर द्यावे की, आम्ही बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करतोय की, तुमच्या भक्तांच्या मते भीक मागून मिळालेल्या स्वातंत्र्याचे? असे ट्विट केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करणारे वक्तव्य सरकारच्या आशिर्वादाने पोसलेले काही महाभाग करू लागले आहेत. यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे असा सुर आता सोशल मिडीयावर व्यक्त होत आहे. आता कंगणावर सरकार काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऐसे लोगों को पद्मश्री दिलाने वाले मोदी जी जवाब दे,
क्या हम कुर्बानियों में मिली 'आजादी' के 75वे वर्ष का जश्न मना रहे है, या आपके भक्तों के अनुसार 'भीख में मिली' आजादी का?
— Srinivas BV (@srinivasiyc) November 10, 2021