अवैध्य वाळू तस्करांचा सुळसुळाट : प्रांताधिकाऱ्यांनी केली धडक कारवाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले (Dr Ajit Thorbole) यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा वाळूचा डंपर ताब्यात घेत जप्त केला. सदरचा डंपर प्रांत कार्यालयाच्या आवारात आणून जमा करण्यात आला.

कर्जतचे प्रांताधिकारी (karjat Sub Divisional Officer) डॉ अजित थोरबोले हे बुधवारी दुपारी कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर जात असताना त्यांना भांडेवाडी शिवारात एक अवैध वाळू वाहतुक करणारा डंपर (एमएच17 बीवाय7281) आढळून आला. सदर डंपर चालकांकडे वाळू वाहतूक करण्याचा अधिकृत परवाना नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावेळी पथकाने सदर डंपर ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी प्रांत कार्यालयाच्या आवारात आणून जमा केला.

सदर कारवाईत तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यासह मंडळ अधिकारी बाळासाहेब सुद्रीक, तलाठी सुनील हसबे, अविनाश रोडगे, अशोक माने, विश्वास राठोड, कोतवाल ज्ञानदेव लोंढे, पोलीस कर्मचारी फिरोज पठाण सहभागी झाले होते.

मांदळी शिवारात पोलीस विभागाची कारवाई

मांदळी(ता. कर्जत) शिवारात रात्र गस्त करीत असताना कर्जत पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. पोलिसांनी एका जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस कर्मचारी मनोज लातूरकर, महादेव कोहक, रवींद्र वाघ, सुनील खैरे, जितेंद्र सरोदे, वाहनचालक शकील बेग सहभागी झाले होते.

कर्जत तालुक्यात वाळू तस्करांचा सुळसुळाट

कर्जत तालुक्यात वाळू तस्करांचा मोठा सुळसुळाट आहे. अवैध्य वाळू तस्करांचे रॅकेट उधवस्त करण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे अशी मागणी जनतेतून होत आहे.