Omicron Corona Variant in India। अहमदनगर जिल्ह्यात 15 परदेशी प्रवासी दाखल, शोध मोहीम सुरू

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Omicron Corona Variant in India | ओमिक्रॉन या कोरोना व्हेरिएंटने जगाची झोप उडवलेली असतानाच भारतातही या व्हेरिएंटचे ०२ रूग्ण सापडल्याने मोठी दहशत पसरलेली आहे.(india found two Omicron patients)

त्यातच परदेशातून अहमदनगर जिल्ह्यात दाखल झालेल्या १५ प्रवाश्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगाने मोहीम हाती घेण्यात आली आहे. (15 foreign passengers admitted in Ahmednagar district, search operation launched)

अति धोकादायक देशांमधून प्रवास करून भारतात दाखल झालेल्या परदेशी प्रवाश्यांचा संपुर्ण महाराष्ट्रात वेगाने शोध घेतला जात आहे. त्यातच मुंबई, पुणे व ठाण्यात ओमिक्रॉनचे २८ संशयित रुग्ण आढळून (28 suspected Omicron patients were found in Mumbai, Pune and Thane) आल्यानंतर महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण आहे. या रूग्णांचे अहवाल काय येतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मागील महिनाभरात अति धोकादायक देशांमधून महाराष्ट्रात परतलेल्या परदेशी प्रवाश्यांचा वेगाने शोध घेतला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात सर्च मोहिम राबवली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातही १५ आंतरराष्ट्रीय प्रवासी आल्याची माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉन तपासणीसाठी या प्रवाश्यांचा वेगाने शोध घेतला जात आहे.

अहमदनगर शहरात सापडले दोन जण

अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात दाखल झालेले १५ आंतरराष्ट्रीय प्रवाशी हे मुंबई आणि दिल्ली येथील विमानतळावर उतरून अहमदनगरला आले आहेत. दोन्ही विमानतळ प्रशासनाने संबंधित प्रवाश्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार या प्रवाशांचा शाेध सुरू करण्यात आला होता.अहमदनगर महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्च मोहिमेत दोघ जणांना शाेधण्यात यश आले आहे. (Two foreign passengers Found in Ahmednagar City) दोघा परदेशी प्रवाश्यांची तातडीने आरोग्य विभागाने कोरोना तपासणी केली आहे. त्यांचे अहवाल येईपर्यंत या दोघांना पुढील १४ दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे.

खालील तालुक्यात शोध सुरू

दरम्यान दिल्ली व मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या यादीनुसार अहमदनगर शहर (०२) काेपरगाव (०२) राहाता (०३) राहुरी (०३) श्रीरामपूरमधील (०४) आणि संगमनेर (०१) असे १५ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.या प्रवाशांचा शाेध सुरू असून, शोध होताच त्यांची तपासणी हाेणार आहे. त्यांच्या तपासणीचा अहवाल काय येतो त्यानंतरच अहमदनगर जिल्ह्याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोर पालन करणे आवश्यक आहे असे अवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.