Maharashtra Electricity Workers Strike । वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर, महाराष्ट्र अंधारात जाणार ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Maharashtra Electricity Workers Strike : एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका बसला आहे. त्यातच आता वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सोमवारी सुरू झालेला वीज कर्मचाऱ्यांचा संप सरकारशी वाटाघाटी न झाल्याने आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (On the way to the Maharashtra Electricity Workers Strike, Maharashtra will go into darkness?)

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत काल बैठक झाली. पण ती बैठक निष्फळ ठरली, शिवाय आज (मंगळवारी) ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे. वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रांवरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह बंद पडलं आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास वीजटंचाई निर्माण होण्याची दाट चिन्हं आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात कालपासूनच (सोमवार) वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अनेक भागात अनेक तासानंतर विज आली. उष्मा वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. परंतू वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होऊन बत्ती गुलचे संकट महाराष्ट्रावर घोंघावत आहे.

दरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांना एक पाऊल पुढे येण्याचे आवाहन केले आहे. खाजगीकरण होऊ देणार नसल्याची स्पष्टोक्ती राऊत यांनी दिली आहे.आज मंगळवारी संपकरी संघटनांबरोबर आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द झाली आहे. या संपाबाबत सरकारला आता यशस्वी मार्ग काढावा लागणार आहे.

दरम्यान, खाजगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारपासून (28 मार्च) अनेक संघटनांनी राज्यात संप पुकारला आहे. या संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांसोबत महावितरण कर्मचारी देखील सामील झाले आहेत. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक भागांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. (Maharashtra Electricity Workers Strike)