Pune fire department। अन् काळ माघारी फिरला : केस वाळवणे पडले भलतेच महागात
Pune fire department rescues 14-year-old girl
पुणे : काळजाचा ठोका चुकवणारी एक थरारक घटना सोमवारी पुण्यातून समोर आली आहे.केस वाळवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर जाणे एका मुलीला भलतेच महागत पडले. (Pune fire department)
इमारतीच्या गच्चीवर जाताच तिचा अचानक तोल गेला अन् ती खाली पडली. परंतू खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकल्यानंतर एका मैत्रिणीने दाखवलेल्या सतर्कतने आणि अग्निशमन दलाच्या रेस्कु ऑपरेशन (Pune Fire Department Rescue Operation) नंतर तिला सुखरूपपणे वाचवले गेल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. नशीबाने साथ दिल्याने मोठ्या वेगाने चालून आलेला काळ मात्र माघारी फिरला.
पुणे शहरातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये एक १४ वर्षाची मुलगी येथील इमारतीच्या गच्चीवरून खाली पडली पडून इमारतीच्या लोखंडी खिडकीच्या ग्रीलला अडकण्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मुलीला वाचवण्यासाठी जो तो धडपड करत होता. ज्या खिडकीच्या ग्रीलला ती अडकली होती तेथील महिलेने तिचा पाय धरुन ठेवला तर वरच्या मजल्यावरील खिडकीतून तिच्या मैत्रिणीने खाली साडी सोडली होती. साडी धरुन ती मुलगी उभी राहिली होती.
दरम्यान घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनटांत अग्नीशमन दलाची (Pune Fire Department) गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमनचे अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांनी पाहिले कि, चौथ्या मजल्यावर एका खिडकीच्या ग्रीलला पाय देऊन एक मुलगी उभी असून तिने साडीला धरुन ठेवले आहे. या मुलीचा हात सुटल्यास ती कधीही खाली पडू शकते अशी स्थिती होती.
हे दृश्य पाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्कू ऑपरेशन (Pune Fire Department Rescue Operation) वेगाने हाती घेतले. तातडीने खाली जाळीचे नेट धरुन ठेवण्यात आले. त्यानंतर काही जणांनी वरच्या मजल्यावर जाऊन तिच्याकडे रस्सी टाकली. तोपर्यंत दुसर्या कर्मचार्यांनी शिडी लावून त्यावरुन जवान तिच्यापर्यंत पोहचले. जवानांनी तिला पकडून खाली आणले. अवघ्या १५ ते २० मिनटांत अग्निशमन विभागाने रेस्क्यू मोहिम पत्ते करत त्या १४ वर्षीय मुलीला वाचवण्याची मोहिम फत्ते केली. (Pune fire department rescues 14-year-old girl)
याबाबत खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले कि, मुलगी केस वाळविण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्यावेळी अचनाक तोल गेल्यामुळे ती खाली आली आणि खिडकीच्या ग्रीलला अडकली.
या कामगिरीमध्ये अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, जवान राहुल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकुळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे, वाहनचालक राजू शेलार यांनी सहभाग घेतला.