Nagpur High Court Verdict 2021 | प्रेमवीरांनो जरा जपुन: प्रेमासाठी ‘ही’ कृती कराल तर…

नागपुर हायकोर्टाचा निर्वाळा

 

नागपूर : प्रेम व्यक्त करण्यासाठी चिठ्ठीचा वापर केला जातो. पंरतु सध्या सोशल मीडियामुळे चिठ्ठी आता कालबाह्य होत असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रेम व्यक्त करणासाठी वापरल्या जाणारा मजकुराच्या चिठ्ठीविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने महत्वाचा निर्वाळा दिला आहे.Nagpur High Court Verdict

न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यानुसार विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र किंवा शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंग आहे. विदर्भातील अकोला (akola) जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.Nagpur High Court Verdict

Nagpur High Court Verdict

काय आहे प्रकरण ?

अकोला येथील एका महिलेने २०११ मध्ये एका ५४ वर्षीय व्यक्तीवर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. आरोपीने पीडित महिलेला एक चिठ्ठी दिली होती. ती घेण्यास तिने नकार दिला होता. त्यानंतर आरोपीने ती चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असं तो तिला म्हणाला. कोणाला न सांगण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर पीडित महिलेने अकोल्यातील सिव्हील लाइन्स पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले.

‘एखाद्या महिलेची अब्रू हा तिचा सगळ्यात मोठा दागिना आहे.

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला २ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयानेसुद्धा आरोपीला दोषी ठरविले. ‘एखाद्या महिलेची अब्रू हा तिचा सगळ्या मोठा दागिना आहे. त्यामुळे तिचा विनयभंग झाला की नाही हे ठरविण्यासाठी एखादे सरसकट समीकरण लागू करता येणार नाही. अशात एखाद्या ४५ वर्षीय विवाहितेच्या अंगावर प्रेम व्यक्त करणारी कविता लिहिलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंगच आहे,’ असं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. Nagpur High Court Verdict