Parit-Dhobi community reservation | आरक्षणाची लढाई लढण्यासाठी समाजाने सज्ज रहावे –  सोनटक्के

जामखेड येथे परिट समाजाचा जिल्हा मेळावा संपन्न

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।Parit-Dhobi community reservation| परिट-धोबी समाजाच्या प्रलंबित आरक्षणाच्या प्रश्नाकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाजाने संघटित होणे गरजेचे आहे.आपल्या हक्काची आरक्षणाची लढाई लढण्यासाठी समाजाला आता मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी समाजाने सज्ज रहावे असे अवाहन महाराष्ट्र राज्य परिट-धोबी समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डी. डी. सोनटक्के यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य धोबी समाज (सर्व भाषिक) महासंघाच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त अहमदनगर जिल्हा समाज बांधवांचा जिल्हा मेळावा आणि कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जामखेड शहरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डी. डी. सोनटक्के बोलत होते.

दरम्यान जामखेडचे पत्रकार ओंकार दळवी यांची संघटनेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी यावेळी संघटनेकडून निवड करण्यात आली.

 

Parit-Dhobi community reservation
जामखेडचे पत्रकार ओंकार दळवी यांची संघटनेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी यावेळी संघटनेकडून निवड करण्यात आली. 

 

यावेळी संस्थापक अध्यक्ष डि डि सोनटक्के,  कार्याध्यक्ष अनिल शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष सचिन कदम, लाॅन्डी प्रदेशाध्यक्ष सुनिल पवार, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रंधे, भैय्याजी रोहणकर, धोबी समाज आरक्षण समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संदिप आढाव, दिपक दळवी, विभागीय युवा अध्यक्ष संतोष वाघ, सुधाकर पवार, रविद्र क्षीरसागर,युवा जिल्हाध्यक्ष प्रसाद राऊत, तालुकाध्यक्ष पांडुरंग नवले, पत्रकार ओंकार दळवी,बंडू पवार आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

Parit-Dhobi community reservation

 

 

पुढे बोलताना डी. डी. सोनटक्के यांनी परिट-धोबी समाजाला आरक्षणाची (Parit-Dhobi community reservation) गरज आणि सुरू असलेला लढा याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने लॉन्ड्रीधारकांना आता वीजबिलात सवलत मिळत आहे. आरक्षणाच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून, समाजानेही आता संघटन मजबूत करून आरक्षणासाठी लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Parit-Dhobi community reservation

आरक्षण समन्वय समितीचे प्रदेश महासचिव अनिल शिंदे यांनी आरक्षणाचा लढाईचा प्रवास, भांडे समितीचा अहवाल आणि परिट-धोबी समाजाची स्थिती यावर अभ्यासपूर्ण माहिती देत संघटन बळकट करण्याचे आवाहन केले.यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला.