Heavy rains in Maharashtra for next five days Orange Alert issued | राज्यात पुढील 05 दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान विभागाचा इशारा

जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारा भुतवडा तलाव भरला

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Heavy rains in Maharashtra for next five days Orange Alert issued | राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होऊ लागला आहे.येत्या चार ते पाच दिवस राज्यात सर्वदुर गडगडाटासह ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाकडून (meteorological department) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.

आज (05 सप्टेंबर रोजी) दुपारी हवामान विभागाने नवा हवामान अंदाज (weather forecast)जारी केला आहे.  05 सप्टेंबर ते 09 सप्टेंबर या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खास करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,कोकणात याचा मोठा प्रभाव असणार आहे.Heavy rains in Maharashtra for next five days Orange Alert issued |

या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी

07 व 08 सप्टेंबरला कोकण व मध्य महाराष्ट्रात तिव्रता जास्त असणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 7 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.Heavy rains in Maharashtra for next five days Orange Alert issued |

राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पुढचे 4 ते 5 दिवस अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.Heavy rains in Maharashtra for next five days Orange Alert issued |

के एस होसाळीकर यांनी ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार येत्या ४८ तासात उत्तर/ उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली आहे. ४ ते ५ दिवसांत कोकणात पावसाचा जास्त प्रभाव राहिल. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.Heavy rains in Maharashtra for next five days Orange Alert issued |

जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारा भुतवडा तलाव भरला

 

Heavy rains in Maharashtra for next five days Orange Alert issued
जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारा भुतवडा तलाव भरला

 

दरम्यान 04 सप्टेंबर रोजी जामखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली, जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारा भुतवडा तलाव आज सकाळी पुर्ण क्षमतेने भरला आहे अशी माहिती लपाचे उप अभियंता रामभाऊ ढेपे यांनी दिली.

भुतवडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्री दमदार पाऊस झाला, बालाघाट डोंगररांगेत झालेल्या दमदार पावसाने रविवारी सकाळी भूतवडा तलाव 100% भरला. भुतवडा तलाव भरल्याने जामखेड शहराचा पाणीप्रश्न प्रश्न सुटला आहे. जामखेडकरांची तहान याच तलावावर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून जामखेडकर पाणी टंचाईला सामोरे जात होते. आता तलाव भरल्याने जामखेडरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान ११९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा भूतवडा व ४८.२५दशलक्ष घनफूट क्षमतेचाभूतवडा जोड तलाव हे दोन्ही तलाव ओसंडून वाहत आहेत. यामुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे. या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न तलाव भरल्याने सुटला आहे.

भूतवडा तलाव आज सकाळी सहाच्या सुमारास 100% भरले. यामुळे विंचरणा नदी आता वाहती झाली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे सांगितल्याने जामखेड परिसरात हा पाऊस झाल्यास विंचरणा नदी वाहती होऊन नदी काठच्या गावांना मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रवासाची प्रतिक्षा आहे. Heavy rains in Maharashtra for next five days Orange Alert issued |