power connection | वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी लाच स्वीकारताना महावितरणचा लाचखोर कनिष्ठ अभियंता अटकेत !

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेचे तोडलेले वीज कनेक्शन ( power connection ) पुन्हा जोडून देण्यासाठी 15 हजाराची लाच स्वीकारताना महावितरणचा (mahavitaran) कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाच्या (acb) जाळ्यात अडकला. ही कारवाई आज श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव या ठिकाणी करण्यात आली. (MSEDCL corrupt junior engineer arrested in Shrigonda taluka while accepting bribe to power connection)

श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बील (msedcl bill payment )थकलेले असल्याने महावितरणने सदर योजनेचे वीज कनेक्शन तोडले होते.यामुळे गावचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता.गावचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू रहावा याकरिता तक्रारदार यांनी महावितरणचा कनिष्ठ अभियंता पांडू पुनाजी मावळी (वय- 36 वर्ष )  वर्ग- 3 म.रा.वि.वि कं, लिंपनगाव (काष्टी 2.सेक्शन) ता- श्रीगोंदा, जि- अहमदनगर याच्याकडे विनंती केली होती. त्यावेळी आरोपी लोकसेवक पांडू मावळी याने  तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपये लाचेची मागणी केली होती.यासंदर्भात तक्रारदार यांनी सदर कनिष्ठ अभियंत्याविरोधात अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज 05 ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील लिंपनगाव येथील हाॅटेल श्रावणी येथे लावलेल्या सापळ्यात 15 हजाराची लाच स्विकारतान कनिष्ठ अभियंता पांडू मावळी याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.(MSEDCL corrupt junior engineer arrested Action of ahmednagar Anti-Corruption Bureau in Shrigonda taluka)

ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पार पाडली. या पथकात पोलिस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलिस हवालदार संतोष शिंदे, विजय गंगुल,रमेश चौधरी, पोलिस अंमलदार, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार राधा खेमनर,  संध्या म्हस्के चालक पोलिस हवालदार  हरुन शेख. राहुल डोळसे यांचा समावेश होता.