बालाघाटात पावसाने उडवली दाणादाण : जामखेड तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान ; शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात मागील  १० ते १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. विशेषता: बालाघाट डोंगररांगेच्या भागात हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. या पावसाने बालाघाटाच्या परिसरात वसलेल्या गावांमध्ये मोठी दाणादाण उडवून दिली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतात पाणी असल्याने पिके सडून गेली आहेत.या भागातील शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आहेत. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी तथाकथित पुढाऱ्यांना वेळ नसल्याचे वास्तव आहे. ( Rains blow up crops in Balaghat: Major damage to agriculture in Jamkhed taluka; Farmers waiting for panchnama )

सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जामखेड तालुक्यातील साकत, कोल्हेवाडी सह आदी भागात सततच्या  पावसामुळे सोयाबीन आणि कांदा जळून गेला, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर शेतात ठेवलेले पीक वाहून गेले आहेत. तसेच काही पिके जागीच सडून गेले आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

Rains blow up crops in Balaghat Major damage to agriculture in Jamkhed taluka Farmers waiting for panchnama

जामखेड तालुका हा मराठवाडा सीमेवर येत असल्याने डोंगरमाथा आणि जामखेड शहर परिसरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने निकष आणि अटींचा विचार न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

युवक क्रांती दल (युक्रांद) संघटनेने वेधले प्रशासनाचे लक्ष

जामखेड तालुक्यात सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अजुनही पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे युवक क्रांती दल या सामाजिक संघटनेने आज जामखेड प्रशासनाचे लक्ष वेधले.  संघटनेने जामखेडचे तहसिलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना निवेदन देत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.यावेळी विशाल नेमाने, विजय घोलप,अजय नेमाने, ब्रह्मदेव कोल्हे, श्रीकृष्ण कोल्हे, अनिल घोगरदरे, विनीत पंडित, योगेश अब्दुले सह आदी उपस्थित होते.

Rains blow up crops in Balaghat Major damage to agriculture in Jamkhed taluka Farmers waiting for panchnama

प्रशासनाचे शेतकऱ्यांना अवाहन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शेतातील छायाचित्र काढावेत.प्रशासन स्तरावर पंचनाम्यांचा निर्णय जाहीर होताच त्या छायाचित्रांची मदत घेता येईल असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. तर कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर म्हणाले कि, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता, अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती भरावी किंवा विमा प्रतिनिधींकडे पीक नुकसान सूचना फॉर्म सादर करावा असे अवाहन करण्यात आले आहे.

Rains blow up crops in Balaghat Major damage to agriculture in Jamkhed taluka Farmers waiting for panchnama