राधाकृष्ण विखे यांच्यानंतर खासदार सुजय विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह | MP Sujay Vikhe Patil Corona Positive

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भाजपचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe patil) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil Corona Positive) हेही सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सुजय विखे हे राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र आहेत.

राज्यात मागील आठवड्यापासून आमदार, खासदार, मंत्री कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळाच्या चिंता वाढल्या आहेत. रोज नवा नेता कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. सार्वजनिक कार्यक्रमात वावरणारे नेते कोरोनाबाधित होऊ लागल्याने जनतेच्या चिंता वाढल्या आहेत.

अहमदनगर ( Ahmednagar) जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेते कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे तीन नेते कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर आता आणखी एका नेत्याची यात भर पडली आहे. (Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe patil, prajakta tanpure)

सुजय विखे यांनी स्वता: ट्विट करत आपण कोरोना पॉझिटिव्ह आलो असल्याची माहिती दिली आहे. विखे यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की,आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचं कारण नाही, परंतू खबरदारी म्हणून मी स्वता: विलगीकरणात जात आहे, असे सांगत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोविड टेस्ट करून घ्यावी असे अवाहन सुजय विखे यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट सक्रीय झाल्याची शंका यावी, अशी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. रविवारी राज्यात 12 हजाराच्या आसपास रूग्ण आढळून आले होते.

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचं कारण नाही, परंतू खबरदारी म्हणून मी स्वता: विलगीकरणात जात आहे, असे सांगत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोविड टेस्ट करून घ्यावी

डॉ सुजय विखे पाटील खासदार,अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार