अवैध दारू विक्री करताना ग्रामपंचायत सदस्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | ३ जानेवारी २०२१ | कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील एका ग्रामपंचायत सदस्याच्या पतीस अवैध दारू विकताना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले. (Husband of Gram Panchayat member arrested for selling illegal liquor in karjat)

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबीजळगाव ता कर्जत येथील ग्रामपंचायत सदस्य असणारा पती आपल्या हॉटेलमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली.

पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी गोवर्धन कदम, शाम जाधव यांना घटनेची शहानिशा करीत पुढील कारवाईचे आदेश दिले.

यावेळी कर्जत पोलिसांना सुरेश आबाजी यादव (रा.आंबीजळगाव ता.कर्जत) अवैध देशी आणि हातभट्टी दारू विक्री करताना निदर्शनास आला त्यास ताब्यात घेत पोलीस कर्मचारी कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.