26 जुलै Kargil Vijay Diwas : वृक्षारोपण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी – न्यायाधीश जगताप

जामखेड - "एक पौधा- एक संकल्प" वृक्षारोपण उपक्रमाची न्यायाधीश एस.आर जगताप यांच्या हस्ते सुरवात

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कारगिल विजय दिवसानिमित्त (Kargil Vijay Diwas) एनसीसीने (National Cadet Corps) आयोजित केलेल्या “एक पौधा – एक संकल्प” उपक्रम कौतुकास्पद आहे व प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लागवड करून ते जोपासवे, कोरोनाची पार्श्वभूमी पाहता वृक्षारोपण व संवर्धन (Plantation and conservation) करने प्रत्येकाची जबाबदारी आहे. यामुळे या उपक्रमात सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी केले.(Jamkhed Court Judge S. R Jagtap)Rashtriya Chhatra Sena

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (National Student Army) वतीने जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) उत्साहात साजरा करण्यात आला.

 

राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहीद भारतीय जवानांना आदरांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. न्यायाधीश एस आर जगताप यांचे हस्ते”एक पौधा-एक संकल्प” उपक्रम निमित्त वृक्षारोपणाची सुरवात जामखेडमध्ये करण्यात आली.हा उपक्रम (17 Maharashtra Battalion NCC) सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे(NCC) कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 

 

 

 

 

यावेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे,पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते , गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे ,वैद्यकीय अधिकारी संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, प्रा मधुकर राळेभात, प्राचार्य अविनाश फलके,

प्राचार्य बी.के.मडके,प्राचार्य श्रीकांत होशिंग,गणेश भोसले,आदिनाथ गीते, एनसीसी अधीकारी गौतम केळकर,अनिल देडे, मयुर भोसले,रमेश बोलभट, प्रवीण उगले,अकाश डोके, ॲड.संग्राम पोले,हर्षल डोके,डॉ सागर शिंदे, बजरंग डोके,पो हे कॉ भगवान पालवे

पो कॉ प्रकाश जाधव,धनराज बिराजदार, तसेच पोलिस विभाग,आरोग्य विभाग,जामखेड न्यायालय विभाग, जामखेड नगर परिषद, शिक्षक, आजी-माझी सैनिक व एनसीसी छात्र (NCC students) यांनी शहीद जवानांना (Kargil Vijay Diwas) आदरांजली वाहून सर्वांनी  “एक पौधा-एक संकल्प” उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी जामखेड महाविद्यालय, ल ना होशिंग विद्यालय, व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय मधील एनसीसी कॅडेट (NCC cadets) उपस्थित होते.