Madhukar Ralebhat : राष्ट्रवादीतून बाहेर पडताच प्रा मधुकर राळेभात यांना आमदार Ram Shinde यांच्याकडून खुली ऑफर, कर्जत जामखेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : संपूर्ण राज्याचं लक्ष लागुन असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत.राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) हुकुमशाही कारभाराविरोधात राष्ट्रवादीतून (NCP-SP) उघडपणे विरोध होऊ लागला आहे.दोन दिवसांपुर्वी जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात (Madhukar Ralebhat) यांनी रोहित पवारांविरोधात बंडाचे निशाण फडकावत पक्षाला रामराम ठोकला. एकिकडे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होत असताना दुसरीकडे आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde BJP) यांनी एक नवी खेळी खेळली आहे. आमदार शिंदे यांनी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांना भाजपात येण्याची खुली ऑफर देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना आमदार करण्यासाठी ज्या नेत्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांमधील सर्वाधिक जनाधार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख तथा जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat) यांनी आमदार रोहित पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून दोन दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत पक्षाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे कुठल्या पक्षात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली असतानाच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat) यांनी भाजपात यावे अशी खुली ऑफर दिली. शिंदे यांच्या या भूमिकेमुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.
जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat) यांनी दोन दिवसापुर्वी पत्रकार परिषद घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पक्षातून बाहेर पडताना प्रा राळेभात यांनी आ रोहित पवारांच्या हुकूमशाही कार्यपध्दतीवर सडकुन टिका केली होती. प्रा मधुकर राळेभात हे जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे असे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे सर्व जाती धर्माचा मोठा जनाधार आहे. सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय असलेल्या प्रा मधुकर राळेभात यांच्यासारख्या जेष्ठ नेता आपल्या पक्षात असावा अशी सर्वच राजकीय पक्षांची पसंती असते. प्रा राळेभात (Madhukar Ralebhat) यांनी भाजपात यावे यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कंबर कसली आहे. आमदार राम शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत राळेभात यांनी भाजपात यावे असे खुले निमंत्रण दिले आहे. जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांच्यासारखा महत्वाच्या नेत्याला भाजपात घेण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
प्रा मधुकर राळेभात यांचा सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनूभव खूप मोठा आहे. ते कायम सामाजिक कार्यात सक्रिय असतात. प्रा मधुकर राळेभात यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. त्याचबरोबर त्यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक लढवत जामखेड तालुक्यात क्रमांक १ ची मते मिळवली होती. जामखेड तालुक्याच्या राजकारणातील जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. कर्जत जामखेडच्या विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी प्रा मधुकर (आबा) राळेभात हे भारतीय जनता पार्टीत आल्यास त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी उघड भूमिका आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मांडली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांविरोधात जोरदार लाट निर्माण झाली आहे. रोहित पवारांनी गेल्या पाच वर्षांत ज्या हुकुमशाही पध्दतीने कारभार केला त्याविरोधात पक्षातील नेते आणि कार्यकर्ते त्याबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील नेत्यांकडून उठाव करत उघडपणे विरोध केला जाऊ लागला आहे. त्यातच मतदारसंघाच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली आणि सर्वाधिक जनाधार असलेल्या प्रा मधुकर राळेभात (Madhukar Ralebhat) या जेष्ठ नेत्याने रोहित पवारांविरोधात बंड पुकारात राष्ट्रवादीत असलेल्या अस्वस्थतेला मोकळी वाट करून दिली आहे. राळेभात यांच्या पाठोपाठ मतदारसंघातील अनेक मोठे नेते आणि प्रभावशाली कार्यकर्ते राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, कर्जत जामखेडच्या राजकारणातील जेष्ठ नेते अशी ओळख असलेल्या प्रा मधुकर (आबा) राळेभात यांना भारतीय जनता पार्टीत घेण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी कंबर कसल्याने राजकीय पटावर नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिलेली खुली ऑफर जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat) हे स्वीकारणार का? याकडे आता संपुर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीतून बाहेर पडताना जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat) नेमकं काय म्हणाले होते ?
मागील विधानसभा निवडणुकीत देशाचे नेते शरद पवार यांचा आदर ठेवून आम्ही रोहित पवार यांना निवडून आणले. स्थानिक भूमिपुत्र तथा राज्याचे कॅबिनेट मंत्र्याचा आम्ही पराभव केला. त्यामुळे रोहित पवार आमदार झाले. परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस हा पक्ष न ठेवता बारामती ॲग्रो लिमिटेडच्या कामगारांसारखी सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना वागणूक दिली. (Madhukar Ralebhat)
कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही. सतत अपमानकारक वागणूक दिली. एकाधिकारशाहीने कारभार केला. याचा आम्हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास झाला. जनतेची कामे होत नव्हती.जनतेच्या कामासाठी त्यांच्या पीएंना फोन केला तर ते फोन उचलत नव्हते. स्वता: रोहित पवारांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष व्हायचे. (Madhukar Ralebhat)
हम करे सो कायदा या प्रमाणे त्यांचा कारभार असायचा. ज्या अपेक्षेने आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले ते सर्व फेल ठरलं. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात रोहित पवार अपयशी ठरले. शासकीय कार्यालये बांधून विकासाचा देखावा उभा केला. पण जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले. पाच वर्षांत कुकडीचे पाणी त्यांना आणता आले नाही.(Madhukar Ralebhat)
पुढे बोलताना राळेभात म्हणाले की, आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षात आपल्याला किंमत दिली जात नाही. सिनियर असो, ज्युनियर असो त्यांना सन्मान दिला जात नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्ते व जेष्ठ नेते नाराज आहेत.त्यामुळे उठाव करावा अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळेच मी पक्षाला आज सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Madhukar Ralebhat)
रोहित पवारांनी स्वपक्षातील नेत्यांचा अवमान करण्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील नेत्यांचाही वारंवार अवमान केला. त्यांना कधीही विचारात घेतलं नाही, त्यांना साधे कार्यक्रमाला कधीही सन्मानाने बोलवलं नाही,
मतदारसंघात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केले त्यांचाही त्यांनी कधी सन्मान राखला नाही. उलट काही कार्यकर्त्यांना सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने भयभीत केले जाते. हुकुमशाही पध्दतीने कार्यकर्त्यांवर नजर ठेवली जाते. कोणीही विरोधात बोलू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात असे गंभीर आरोप यावेळी त्यांनी रोहित पवारांविरोधात केले होते. (Madhukar Ralebhat)