जामखेड : कुसडगाव SRPF सेंटरमध्ये मेरी माटी-मेरा देश उपक्रमाअंतर्गत विविध क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमदार प्रा राम शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून जामखेड तालुक्यात उभारण्यात आलेल्या कुसडगाव एसआरपीफ (Kusadgaon SRPF) सेंटरमध्ये मेरी माटी-मेरा देश या उपक्रमांतर्गत विविध क्रिडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश पाटील व जामखेड बाजार समितीचे सभापती पै शरद (दादा) कार्ले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर यंदा मेरी माटी- मेरा देश या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम देशभर साजरे होत आहेत. जामखेड तालुक्यातील कुसडगावच्या एसआरपीफ सेंटरमध्ये विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पोलिस बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भालाफेक, गोळाफेक,100 मीटर रनिंग, खो खो, हॉलीबॉल, कबड्डी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी एसआरपीफ सेंटरचे अधिकारी दिलीप खेडेकर, विकास पाटील साहेब, पोलिस निरीक्षक महेश पाटील, बाजार समितीचे सभापती पै शरद (दादा) कार्ले, माजी सरपंच बापुराव ढवळे, सरपंच राजेंद्र ओमासे, सरपंच पप्पु कात्रजकर,अजय सातव, नजीरभाई सह आदी उपस्थित होते.