जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बहिण भावाच्या अतुट अश्या प्रेमळ नात्याची ओळख करून देणारा सण म्हणून रक्षाबंधन या सणाला ओळखले जाते. आज संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळातील दिग्गज नेत्यांनी आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा केला आहे.

राजकीय धावपळीतून वेळ काढत राजकीय नेत्यांनी पारंपरिक पध्दतीने रक्षाबंधन साजरं केलं. कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे यांनीही रक्षाबंधन सण साजरा केला. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. आमदार प्रा.राम शिंदे यांना त्यांच्या भगिनींनी राखी बांधली. यावेळी शिंदे यांच्या निवासस्थानी अतिशय मंगलमय वातावरण होते.

रक्षाबंधनानिमित्त आमदार प्रा.राम शिंदे यांच्या भगिनी सीताबाई भांड, ताई भांड व गुरु बहीन हौसाबाई बनाते या भगिनींनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे ह्या उपस्थित होत्या. सर्व भावंडांनी आईचे दर्शन घेतले. रक्षाबंधनानंतर आमदार प्रा राम शिंदे हे मतदारसंघातील जनतेच्या भेटीसाठी रवाना झाले.
