601 किलोंच्या जैविक खतांचा केक कापत 600 वृक्षांचा वाढदिवस साजरा | Celebrate the birthday of 600 trees by cutting a cake of 601 kg of organic fertilizer

जामखेड टाईम्स वृत्तसेवा, दि, १ जानेवारी २०२२ ।  भल्या पहाटे दैनंदिन प्रमाणे ताशाचा गजर, ६०० मान्यवर असणाऱ्या “बर्थडे बॉयना” मानाचा फेटा आणि आणि चक्क ६०१ किलोचा केक. आपला पहिला वाढदिवस साजरा करणाऱ्या वृक्षांना प्रत्येक श्रमदात्यानी खताचा केक भरवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माझी वसुंधरा स्पर्धेत सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांनी लावलेल्या वृक्षांचा अनोखा वाढदिवस शनिवारी साजरा केला. यावेळी कर्जत-राशीन रोडला आणखी १०० झाडे लावत महाश्रमदान पार पडले. (Celebrate the birthday of 600 trees by cutting a cake of 601 kg of organic fertilizer)

Celebrate the birthday of 600 trees by cutting a cake of 601 kg of organic fertilizer

सर्व सामाजिक संघटना कर्जत आणि कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षी १ जाने २०२१ रोजी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माझी वसुंधरा स्पर्धा १ मध्ये ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. ती सर्व झाडे या ध्येयवेड्या श्रमदात्यानी उत्तम निगा आणि काळजी घेत जोपासली होती.

Celebrate the birthday of 600 trees by cutting a cake of 601 kg of organic fertilizer

शनिवार, दि १ जाने २०२२ रोजी यासर्व वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचे आयोजन सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांनी केले होते. यासह कर्जत-राशीन रोडला आणखी १०० नव्या वृक्षांचे रोपन करण्यात आले. पहाटे या सर्व वाढदिवस साजरा करणाऱ्या ६०० वृक्षांना मानाचा फेटा बांधण्यात आला. यावेळी महिला श्रमप्रेमी प्रतिनिधीनी कंपोस्ट खताचा ६०१ किलोचा केक तयार करीत त्यावर माझी वसुंधरा आणि सर्व सामाजिक संघटना यांचा लोगो फुलांची आरास आकारण्यात आली होती.

Celebrate the birthday of 600 trees by cutting a cake of 601 kg of organic fertilizer

लहान श्रमप्रेमी असणाऱ्या बाळगोपाळाच्या हस्ते तो केक कापून प्रत्येक श्रमप्रेमीनी वाढदिवस असणाऱ्या वृक्षांना स्नेहपूर्वक भरवला. आणि रोज तेवढ्याच स्नेहाने काळजी घेत त्याची निगा राखण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, निवृत्त वन अधिकारी अनिल तोरडमल, काँग्रेसचे नेते प्रविण घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्व श्रमप्रेमीच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सर्व प्रशासकीय प्रमुख अधिकारी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार बांधव, एनसीसी छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे छात्र आणि मोठ्या संख्येने श्रमप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब रानमाळ मेजर आणि अशोक नेवसे यांनी केले.

Celebrate the birthday of 600 trees by cutting a cake of 601 kg of organic fertilizer

४५७ दिवसापासून राबतायेत हजारो हात

२ ऑक्टो २०२० पासून सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार कर्जत शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेत आहे. स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा १ आणि आता माझी वसुंधरा २ स्पर्धेसाठी मागील ४५७ दिवसापासून हजारो हात “स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत आणि हरीत कर्जतसाठी” कष्ट घेत आहे. सर्व श्रमप्रेमी एका कुटुंबाप्रमाणे ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता आपले श्रमदान अविरत पार पाडताना दिसतात.

  • Birthday celebrations were held at 600 trees in Karjat.