संतापजनक : बापच बनला हैवान, पोटच्या लेकीवर केला लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या घटनेनं पुण्यात उडाली मोठी खळबळ

पुणे, 29 जून 2023 : Pune Rape Case: एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे. या संतापजनक घटनेत बापानेच आपल्या पोटच्या लेकीवर बलात्कार करत बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासला आहे. ही खळबळजनक घटना वानवडी पोलिस स्टेशन (Wanwadi Police Station) हद्दीतून उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेलं आहे. (Pune Latest Crime News)

Infuriating, father became an animal, 17 years old girl sexually assaulted, incident of rape created big sensation in Pune, Wanwadi Police Station, pune latest crime news,

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या रूममध्ये झोपलेली असताना तिच्यावर तिच्याच नराधम बापाने बलात्कार केला. ही घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास घडली.घटनेच्या वेळी पिडीत मुलीचा बाप दारूच्या नशेत होता.धक्कादायक बाब म्हणजे पिडीत मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला, पण तिच्या आईने तिला गप्प बसण्यास सांगितले.तसेच जे घडलं ते कोणाला सांगु नको अशी तिला धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

http://jamkhedtimes.com/pune-crime-news-what-is-going-on-in-pune-after-koyta-gang-another-gang-terror-kuhrad-gang-vandalized-sweet-shop-panic-spread-among-citizens-pune-latest-news-in-marathi/

परंतू सदर पिडीत मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार तिच्या मित्राला सांगितला. तेव्हा मुलीच्या मित्रालाही मुलीच्या आईने धमकावले. त्याला शांत राहण्यास सांगितले. परंतू मुलीने धाडस करत थेट वानवडी पोलिस स्टेशन गाठले.तिच्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पिडीत मुलीची फिर्याद दाखल करून घेतली. याच तक्रारीवरून तिच्या बापाला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. वानवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.(Pune Latest Crime News Today)