हजारो नागरिकांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मराठ्यांच्या शेवटच्या विजयी लढाईचा ऐतिहासिक साक्षीदार असलेल्या खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्याच्या प्रांगणात थोड्याच वेळात भारतातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होणार आहे.

खर्डा नगरीत अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडत असलेल्या या कार्यक्रमासाठी हजारो नागरिक लोटले आहेत. कार्यक्रमस्थळी अतिशय जोषपूर्ण वातावरण आहे. कार्यक्रमासाठी राज्यभरातील संत महंत दाखल झाले आहे.