उद्या खर्ड्याहून भूम – उस्मानाबादकडे जाणारी वाहतुक वळवली जाणार : वाहतुकीसाठी असा असेल पर्यायी मार्ग

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  दसऱ्याच्या मुहूर्तावर जामखेड तालुक्यातील खर्डा येथे होणाऱ्या ऐतिहासिक स्वराज्य ध्वज प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खर्डा शहरातून उस्मानाबादकडे जाणारी वाहतुक खर्डा जवळील जातेगाव फाट्यावरून उस्मानाबादकडे  वळवण्यात आली आहे. उद्या १५ रोजी पर्यायी मार्गाने उस्मानाबादकडे जाणारी वाहतूक सुरु राहील तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज १४ रोजी काढले आहेत. (Traffic from Kharda to Bhum-Osmanabad diverted his will be the alternative route for tomorro

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ऐतिहासिक खर्डा किल्ला परिसरात देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर उभारला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध संत महंत, राजे महाराज यांचे वंशज, तसेच संरक्षित व्यक्ती  उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा व परिसरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक खाजगी वाहनाने येण्याची शक्यता आहे. सदर परिसरात वाहतुक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खर्डा गावातून उस्मानाबादकडे जाणारी वाहतुक 15 रोजी सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेपर्यंत जातेगाव फाट्याहून उस्मानाबादकडे (भूम) वळवण्यात आली आहे. (Traffic from Kharda to Bhum-Osmanabad will be diverted tomorrow Alternative route for transport)

असा असेल पर्यायी मार्ग

जातेगाव फाटा – जातेगाव रोड – निपाणी फाटा – निपाणी  – ईट – वडाची वाडी – पाथरूड  – भूम – उस्मानाबाद