कर्जत नगरपंचायत निवडणुकीत दुपारी दीड वाजेपर्यंत 60 टक्के मतदान | 60 Percent turnout in Karjat Nagar Panchayat elections till 1.30 pm
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत नगरपंचायतच्या दुसर्या टप्प्यातील 4 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. दुपारी दीड वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले होते. (60 Percent Turnout In Karjat Nagar Panchayat Elections Till 1.30 Pm)
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा अनेक अर्थाने वादग्रस्त ठरला होता. आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने कर्जतचे राजकीय वातावरण चांगलेच स्फोटक बनले होते. परंतू दुसर्या टप्प्यातील प्रचार वादग्रस्त ठरला नाही. पवार व शिंदे यांनी उणीदुणी न काढत प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला.
- National Lok Adalat 2022 | अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत
- जामखेड पत्रकार संघात उभी फुट,11 जणांनी पुकारले बंड
- सरकारी कामात अडथळा, फरार आरोपींना जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Kusadgaon SRPF Group 19 | कुसडगाव SRPF प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी 35 कोटींची वर्क ऑर्डर
- संत वामनभाऊ महाराज दिंडीचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात संपन्न
आज कर्जत नगरपंचायत निवडणूकीच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. सकाळपासून मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. चारही प्रभागात चुरशीचे मतदान होत आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत शांततेच्या वातावरणात मतदान पार पडले. सध्या 60 टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील चार जागांवर विक्रमी मतदान होण्याची शक्यता दिसत आहे.
