चोंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 228 वी पुण्यतिथी साजरी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून आलेल्या धनगर समाजबांधवांनी चोंडीतील स्मृतीस्तंभाला भेट देऊन अभिवादन केले. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आज अभिवादन सभा पार पडली.

228th death anniversary of Ahilya Devi Holkar celebrated in Chondi

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चोंडीत आज 228 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता पुष्प वाहून राज्यभरातून आलेल्या धनगर समाज बांधवांनी अभिवादन केले.त्यानंतर अभिवादन सभा झाली. यात अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

228th death anniversary of Ahilya Devi Holkar celebrated in Chondi

यावेळी माजी ग्रामविकास मंत्री आण् डांगे, माजी आमदार रामहारी रुपनवर, धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक चिमन डांगे,  पांडुरंग उबाळे, बाबासाहेब पाटील,आविनाश शिंदे, मल्हार सेना प्रमुख बबनराव रानगे,अहिल्या वाहिनीच्या प्रमुख अलकाताई गोडे, प्रा अंकुश निर्मळ, प्रा अरूण घोडके, पुष्पाताई गुलवाडे (आकोला), संभाजीराव कचरे (सांगली),

228th death anniversary of Ahilya Devi Holkar celebrated in Chondi

सुनिलभाऊ वाघ(धुळे),सुनिल मलगुंडे,शिवाजीराव ढेपळे, प्रा संभाजीराव बैखरे (लातुर),अशोकराव देवकाते (बुलढाना), संदीप तेली (जळगाव), प्रा युवराज घोडे (नागपुर), छगनराव नांगरे (कोल्हापुर), झिंबळ साहेब आटपाडी,प्रकाश कनप (सांगली), आविनाश खरात ,(सांगली), चोंडीचे उपसरपंच कल्याण शिंदे, भाजपा सोशल मिडीया प्रमुख उध्दव हुलगुंडे सह मोठ्या संखेने समाज बांधव उपस्थित होते.

228th death anniversary of Ahilya Devi Holkar celebrated in Chondi

दरम्यान पुण्यतिथी कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात आणि त्यांची टीम सकाळपासून चोंडीत तळ ठोकून आहे.