Mahavikas Aghadi | ठरलं ! आगामी सर्व निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचे लक्ष आहे. अगामी निवडणूका महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्ष एकत्र लढणार आहोत अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. (Mahavikas Aghadi will fight all the upcoming elections together)

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे शनिवारी अकोला जिल्हा दौर्‍यावर होते त्यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत त्यांनी वरील वक्तव्य केले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की,राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मिळून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवणे हाच महाविकास आघाडीचा उद्देश असून, त्यासाठी आगामी सर्व निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढविणार आहेत. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi ) लढविणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. यावेळी महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या