Celebrated 100th Rakshabandhan | संडे स्पशेल: बहिण भावाची जोडी हिट; केले शंभरावे रक्षाबंधन साजरे !

 

Celebrated 100th Rakshabandhan|जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  बहिण – भावाच्या अतुट नात्याचा रक्षाबंधन हा सण आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अश्यातच कोणी रक्षाबंधनाचे शतक साजरे करत असेल का ? तर उत्तर नाही असेच येईल परंतू शंभरावे रक्षाबंधन साजरे करणारी बहिण भावाची एक कहाणी समोर आली आहे.

दरवर्षी राखीपोर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहिणी माहेरी येऊन भावाला राखी बांधतात तर सासरी असलेल्या बहिणीकडे जाऊन भाऊराया राखी बांधून घेतो. मानवी नात्यातील सर्वात महत्वाचा हा सण भावाकडून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी निश्चित करतो.

आज पुणे जिल्ह्यातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र याच पुण्यातील एका बहीण भावांच्या जोडीनं साजरं केलेलं रक्षाबंधन फार खास आहे. कारण त्यांच्या रक्षाबंधनाने आज शंभरी पूर्ण केली आहे. (Celebrated 100th Rakshabandhan)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सटलवाडी इथल्या अनुसया आणि गणपत आजोबांनी आपल्या राखी पौर्णिमेची शंभरी पार केलीये. अनुसया आजी आणि गपणत आजोबांचे हे आजही या वयात एकमेकांना राखी बांधतात. (Celebrated 100th Rakshabandhan)

104 वर्षांच्या अनुसया गायकवाड यांनी 102 वर्षांच्या गजानन गणपत कदम यांना आजंही राखी बांधलीये. यंदाची ही त्यांची पहिलं दुसरं नव्हे तर शंभरावं रक्षाबंधन आहे. (According to 104-year-old Anusaya Gaikwad, 102-year-old Gajanan Ganpat Kadam still wore rakhi today. This year is not his first or second but his 100th Rakshabandhan.)

अनुसया आजी या दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या आहेत. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी न चुकता आज या वयात देखील राखी बांधण्यासाठी येत असतात या संबंधीचे वृत्त झी चोवीस तास या वृत्तवाहिनीने दिले आहे.

राखीच्या दिवशी कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई ताटात ठेवल्या जातात. राखीच्या दिवशी भावाला टिळक लावून आणि त्याच्या मनगटावर राखी बांधली जाते. राखी बांधल्यानंतर भाऊ भेटवस्तू देतो. या विशेष दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात.