Earthquake shakes Aheri Sironcha taluka in Gadchiroli district of Vidarbha maharashtra | ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र भूकंपाने हादरला | विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी व सिरोंचा तालुक्यात भूकंपाचे धक्के !
Earthquake shakes Aheri Sironcha taluka in Gadchiroli district of Vidarbha maharashtra । जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भूकंपांची तीव्रता कमी असल्याचे समोर येत असले तरी भविष्यात मोठ्या धोक्याचे हे तर संकेत नाहीत ना ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
राज्याच्या ज्या ज्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत त्या भागात सध्या भीतीचे वातावरण आहे. अश्यातच महाराष्ट्रात रविवारची सायंकाळ पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली.
विदर्भात रविवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने मोठी घबराट पसरली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद पॅचपासून 77 किलोमीटर अंतरावरील परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले (Earthquake shakes Aheri Sironcha taluka in Gadchiroli district) अहेरी तालुक्यातील अहेरी आलापल्ली राजाराम जिम्मलगट्टा गोमणी व सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद पॅच बामनी सिरोंचा, सिरोंचा माल या भागात भूकंपाचे धक्के जास्त जाणवले.(Earthquake shakes Aheri Sironcha taluka in Gadchiroli district of Vidarbha maharashtra)
रविवारी सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी गडचिरोली जिल्ह्यात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गडचिरोली आणि तेलंगाणा सीमेवरील जाफराबाद चाक (प्राणहिता नदी) तालुका सिरोंचा तसेच अहेरी, आष्टी या भागात सुद्धा हलके-मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे झटके जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.
अचानक भूकंप होताच नागरिकांनी घराबाहेर पडले होते. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गडचिरोलीत झालेल्या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
मागील आठवड्यात सातारा आणि रत्नागिरीला भूकंपाचे धक्के
गेल्या आठवड्यात सातार जिल्ह्यातील पाटण तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यालाही भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. (Earthquake shakes Satara and Ratnagiri) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसरात रविवारी 3.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य स्वरुपाचा धक्का बसला. सौम्य स्वरूपाच्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू हा कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर होता. तर भूकंपाची जमिनीतील खोली 11.37 किलोमीटर अंतरावर होती.
दक्षिण भारतात भूकंपाच्या 3 आणि 4 या अत्यंत महत्वाच्या झोनमध्ये रत्नागिरी जिल्हा येत असल्याने या भूकंपामुळे धाकधूक वाढली आहे. गेल्या रविवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी रत्नागिरी जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपाचे हे केंद्र संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर येथील सुतारवाडी येथे जमिनीपासून 5 मी अंतरावर 4.5 रिश्टर स्केलचा धक्का बसला. या धक्क्यामुळे कोणते नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले नव्हते. मात्र भूकंपाचा हा धक्का चांगलाच जोरदार होता. (Earthquake shakes Aheri Sironcha taluka in Gadchiroli district of Vidarbha maharashtra)