- Advertisement -

India vs New Zealand T20 World Cup match live score : भारताने न्यूझीलंडसमोर दिले 111 धावांचे अव्हान

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : India vs New Zealand T20 World Cup match live score । T20 विश्वचषक स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. भारताची सलामी जोडी स्वस्तात तंबूत परतल्यानंतर भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

भारत विरूध्द न्यूझीलंड या सामन्यात भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असतानाच भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा निराशजनक झाली. भारताने न्यूझीलंड समोर अवघे 111 धावांचे लक्ष्य दिले आहे.भारताला न्यूझीलंडने अवघ्या 110 धावांत रोखले. भारताने 07 फलंदाजांच्या बदल्यात 20 षटकांत अवघ्या 110 केल्या.

भारतीय फलंदाजी खालील प्रमाणे

1) के एल राहूल  (18 धावा)

2) इशान किशन (04 धावा)

3)  रोहित शर्मा (14 धावा)

4) विराट कोहली (09 धावा )

5) ऋषभ पंत (12 धावा)

6) हार्दिक पांड्या (23 धावा)

7) रविंद्र जडेजा ( नाबाद 26 धावा)

8) शार्दुल ठाकूर  ( शुन्य धावा)

9) मोहम्मद शमी ( नाबाद शुन्य )