वर्ध्यात दिवसाढवळ्या दरोडा,लाखोंचा ऐवज लंपास

वर्धा: वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा पडल्याची घटना आज, गुरुवारी घडली. दरोडेखोरांनी ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटून पोबारा केला. बँक लुटल्यानंतर दरोडेखोर कर्मचाऱ्यांच्या दुचाकी घेऊन त्यावरून पसार झाले.

मुथुट फायनान्सच्या बँकेचे कामकाज गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुरू होत होते. तितक्यात मास्क लावलेल्या व डोके झाकलेल्या दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. बंदूक व चाकूच्या धाकावर त्यांनी कर्मचाऱ्यांना गप्प बसायला लावले व बँकेवर दरोडा घातला. यात त्यांनी तीन लाख अठरा हजार रुपयांची रोकड व साडेतीन किलो सोने लुटून नेले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाचे काम वेगाने सुरू केले आहे.