मोठी बातमी : आमदार राम शिंदेंसह दहा जणांचा शपथविधी संपन्न

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या दहा आमदारांचा शपथविधी आज विधानभवनामध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. (Ten MLAs including Ram Shinde were sworn in)

मागील महिन्यामध्ये विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अतिशय चुरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली होती.या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत आपले सर्व उमेदवार निवडून आणले होते. निवडणुकीमध्ये भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला होता.

विधानपरिषद निवडणुकीमध्ये विजय झालेले आमदार राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार प्रवीण दरेकर, आमदार उमाताई खापरे, आमदार एकनाथ खडसे, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार सचिन आहीर, आमदार आमश्या पाडवी, आमदार भाई जगताप या दहा आमदारांचा शपथविधी आज विधानभवनामध्ये संपन्न झाला.

आमदार राम शिंदे यांच्या शपथविधीसाठी कर्जत जामखेड मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले होते. पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य भगवान मुरूमकर, बाजीराव गोपाळघरे, सचिन पोटरे, बाजार समितीचे माजी सभापती गौतम उत्तेकर, पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचरणे, लहू शिंदे, सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.