धक्कादायक  : महिला डॉक्टरच्या बेडरूममध्ये छुप्या कॅमेर्‍याचा वाॅच (Hidden cameras)

Shocking: Hidden cameras found in the bedroom and bathroom of a female doctor at Bharati University Hospital

पुणे : एका महिला डाॅक्टरच्या बेडरूमसह बाथरूममध्ये छुपे कॅमेरे (Hidden cameras) आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.ही धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. याप्रकरणी महिला डाॅक्टरच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Shocking: Hidden cameras found in the bedroom and bathroom of a female doctor at Bharati University Hospital)

याबाबत सविस्तर असे की, पुण्यातील भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये एक महिला डाॅक्टर कार्यरत आहे. त्या विद्यापीठ परिसरातील स्टाफ क्वार्टरमध्ये राहतात. सदर महिला डाॅक्टर सहा जुलैला सकाळी पावणेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्या.फ्रेश होण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या असता, त्यांनी बल्ब लावण्यासाठी बाथरूममधील ‘स्वीच ऑन’ केला. मात्र, बल्ब लागला नाही. (Shocking: Hidden cameras found in the bedroom and bathroom of a female doctor at Bharati University Hospital)

Hidden cameras
Bharati University Police Station

तो बल्ब काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली. त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून घेत सदर बल्ब दाखवला. तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याची धक्कादाय माहिती त्यांना दिली. त्यानंतर फिर्यादी डाॅक्टरने घरातील अन्य दिव्यांची पाहणी केली. त्यात बेडरूममध्येही असाच बल्ब लावल्याचे आढळून आला होता. या धक्कादायक प्रकारामुळे संबंधित महिला डाॅक्टर पुरत्या हादरून गेल्या होत्या. (Shocking: Hidden cameras found in the bedroom and bathroom of a female doctor at Bharati University Hospital)

Hidden cameras
Bharti University Hospital

दरम्यान आपल्या खोलीतील बेडरूम व बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले गेल्याची धक्कादायक बाब समोर येताच घाबरलेल्या महिला डाॅक्टरने तातडीने सदर घटनेची खबर पोलिसांना दिली.या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि महिला पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. (Shocking: Hidden cameras found in the bedroom and bathroom of a female doctor at Bharati University Hospital)

 

सदर धक्कादायक प्रकार पुण्यातील सातारा रस्त्यावरील भारती विद्यापीठ हॉस्पिटल कॅम्पसमधील स्टाफ क्वॉर्टरमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  (Bharti University Police Thane) त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bharti University Hospital on Satara Road. The woman has lodged a complaint at the Bharati University Police Station) हा प्रकार सहा जुलैला सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी सात वाजून २० मिनिटे या कालावधीत घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(Shocking: Hidden cameras found in the bedroom and bathroom of a female doctor at Bharati University Hospital)

फिर्यादी सकाळी ड्युटीला गेल्यानंतर अज्ञाताने बनावट चावीच्या सहाय्याने (With the help of fake keys) त्यांच्या घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर संबंधिताने छुपे कॅमेरे असलेले बल्ब घरात बसवले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. (Shocking : Hidden cameras found in the bedroom and bathroom of a female doctor at Bharati University Hospital)