- Advertisement -

जामखेडकरांनो सावधान कोरोना वाढतोय (Jamkhedkars beware, Corona is growing)

जामखेड तालुक्यातील १३ गावांमध्ये एकुण १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले.

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रीय झाला आहे. बुधवारी तालुक्यात २४ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्यानंतर गुरूवारी तालुक्यात नव्याने १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.(Jamkhedkars beware, Corona is growing)

जामखेड तालुक्यात गुरूवारी दिवसभरात ५७४ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या तर ४५७ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. (Jamkhedkars beware, Corona is growing)

गुरूवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ५७४ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये जामखेड ०१,साकत ०१, जवळा ०१, नाहुली ०१,बावी ०२ ०१, धोंडपारगाव ०१, डिसलेवाडी ०३, रत्नापुर ०१, कडभनवाडी०३, तेलंगशी ०२,पाडळी ०१, देवदैठण ०१ या १८ रूग्णांचा समावेश आहे.तर ०३ कोरोना बाधित हे बाहेरील तालुक्यातील आहेत. RTPCR अहवालात खांडवी येथील 01 जण कोरोना बाधित आढळून आला आहे. गुरूवारी दिवसभरात जामखेड तालुक्यातील १३ गावांमध्ये एकुण १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली. (Jamkhedkars beware, Corona is growing)