Rohit Pawar : खर्डा व जवळ्यात शिवभोजन थाळी केंद्र सुरु ! (Shivbhojan Thali Kendra)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : जामखेड  तालुक्यातील खर्डा व जवळा या दोन मोठ्या गावांमध्ये राज्य सरकारने हाती घेतलेल्या शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. (Shivbhojan Thali Kendra started at Kharda and jawala)

आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या पुढाकारातुन हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.कोरोनाच्या या सद्यपरिस्थितीत रोजंदारीवर काम करणा-या अनेकांची कामे बंद आहेत, अशा परिस्थितीत गरीब व गरजू नागरिकांचे जेवणाचे हाल होऊ नयेत यासाठी शिवभोजन थाळीचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम अनेक गरीब व गरजू नागरिकांसाठी वरदान ठरण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने जामखेड (Jamkhed) तालुक्यात मोठा हाहाकार उडवला आहे. यामुळे तालुक्यात सध्या लाॅकडाऊन सुरू आहे. या काळात हातावर पोट असलेल्या गोरगरीब मजुरांचे कामे बंद आहेत. रोजंदारी नसल्याने गोरगरिबांचे अन्नावाचुन हाल होऊ नये याकरिता आमदार रोहित पवार यांनी खर्डा व जवळा याठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. (Shivbhojan Thali Kendra started at Kharda and Jawala)

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील इंग्लिश स्कूलसमोर तर दुसरे केंद्र जवळा येथे बस स्टँडसमोर हॉटेल समाधान येथे सुरु करण्यात आले आहे. या दोन्ही केंद्रांवर दररोज सकाळी ८ ते ४ या वेळेत मोफत जेवणाची थाळी देण्यात येत आहे.  रोहित पवार यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आलेल्या या शिवभोजन थाळी उपक्रमामुळे जामखेडमधील गरीब व गरजू नागरिकांना दिलासा मिळाला आहे.