जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. आज 15 मे रोजी जामखेड तालुक्यात कोरोनाने शतक साजरे केले आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी थंडावणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.परंतु रोज वाढत जाणारे आकडे धडकी भरवणारे ठरू लागले आहेत. एकिकडे कोरोनाचा आधीच विध्वंस सुरू होता त्यात आता म्युकर माइकोसिसची भर पडल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच तालुक्यातील हळगाव, राजुरी, नागोबाचीवाडी, सोनेगाव, सतेवाडी या गावांची परिस्थिती बिघडण्याचे चिन्हे दिसु लागली आहेत.
जामखेड तालुका आरोग्य विभागाने आज दिवसभरात तब्बल 499 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये जामखेड 03, नागोबाचीवाडी 06, खडकवाडी 01, भवरवाडी 02, मोहा 01, पाडळी 04, राजुरी 21, सोनेगाव 05, सतेवाडी 06, जायभायवाडी 02, तेलंगशी 01, नान्नज 02 असे 54 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
तर आज प्रशासनाला जिल्हा रूग्णालयाकडून 355 नागरिकांचे RTPCR तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत यामध्ये जामखेड, 06, डोणगाव 01, पिंपरखेड 01, हळगाव 21, बावी 01, पाटोदा 01, तेलंगशी 02, जायभायवाडी 01, सतेवाडी 01, पांढरेवाडी 01, वाकी 01, घोडेगाव 02, वाघा 01, दिघोळ 01, मोहरी 01, दौंडवाडी 01, नान्नज 02, पोतेवाडी 03, महारूळी 01, सावरगाव 01, साकत 01, पिंपळवाडी 03, सारोळा 01, राजुरी 03, काटेवाडी 03, मोहा 02 असे एकुण 63 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तसेच आज दिवसभरात आरोग्य विभागाने 177 नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सुनिल बोराडे यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
हळगावमधील लाॅकडाऊन वाढला
जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने 15 मे रोजी संपणारा लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दि 25 मे पर्यंत हा लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. मेडीकल , दवाखाने व दुध वगळता सर्व व्यवहार या काळात बंद राहणार आहेत. या लाॅकडाऊनचे काटेकोर पालन करावे जे कोणी लाॅकडाऊनचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामसेविका निलिमा कुबसंगे यांनी दिला आहे.
कोरोना ग्रामदक्षता समितीने केले किराणा दुकान सील
जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठा उद्रेक वाढला आहे. सध्या गावात लाॅकडाऊन सुरू असुन सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. एकिकडे कोरोनाची साखळी तुटावी यासाठी गावकरी प्रयत्नांची पराकाष्टा करत असतानाच गावातील मोजके व्यवसायिक लाॅकडाऊन नियमांचे उल्लंघन करून आपले दुकाने सुरू ठेवत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ग्रामपंचायतने वारंवार सुचना देऊनही हे दुकानदार ऐकत नव्हते. त्यानुसार ग्रामपंचायत व कोरोना ग्रामदक्षता समिती यांनी आज 15 मे रोजी सुरेश कांकरिया यांचे सचिन ट्रेडर्स हे किराणा दुकान सील करण्याची कारवाई केली आहे.या कारवाईच्या पथकात ग्रामसेविका निलिमा कुबसंगे, तलाठी प्रफुल्ल साळवे , पोलिस पाटील सुरेश ढवळे, धनंजय ढवळे सह आदी उपस्थित होते.