- Advertisement -

पुढील पाच दिवस पावसाचे, राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी : जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यात काय असेल स्थिती ?  

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यातून मान्सून माघारी परतला असला तरी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने पावसाची स्थिती आहे. बदलत्या हवामानाचा फटका शेती क्षेत्राला बसत आहे. यावर्षी पावसाने राज्यात ज्या प्रकारे हाहाकार माजवला होता ते पाहता आता सावध होण्याची आवश्यकता आहे. बदलत्या हवामानाला सामोरे जात असताना त्याचा सामना करण्यासाठी नव्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय.

दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून दूर गेलं आहे. यानंतर आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढणार आहे.

याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची (Rain in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. राज्यातील खालील भागात हवामान विभागाने ‘येलो अलर्ट‘ जारी केला आहे.

१२ नोव्हेंबर : सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड

१३ नोव्हेंबर : बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग

१४ नोव्हेंबर : अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, पुणे, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड.

१५ नोव्हेंबर : अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, पुणे, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग

१६ नोव्हेंबर : अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, पुणे, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग