Palak Mantri of Maharashtra 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या आधी होणार महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची घोषणा – सुत्रांची माहिती
Palak Mantri of Maharashtra 2025 : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची (Palak Mantri 2025) निवड लगेचच होईल अशी शक्यता होती. परंतू भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तीनही पक्षांत (Mahayuti) एकमत न झाल्याने पालकमंत्र्यांच्या निवडी रखडल्या आहेत.परंतू आता २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या आधी महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पालकमंत्री यादी जाहीर होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. (Palak Mantri List Maharashtra 2025)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या निवडीबाबत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी पालकमंत्र्यांच्या याद्या (Palak Mantri Yadi 2025 Maharashtra) अंतिम केल्या आहेत. राज्यातील रायगड, पुणे व संभाजीनगर यांसारख्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांवर एकमत होणे बाकी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री याद्यांवर (Palak Mantri list 2025) सविस्तर चर्चा करण्यात आली असून प्रजासत्ताक दिनाच्या आधी सरकारकडून पालकमंत्र्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती आहे. (palak mantri maharashtra)
पालकमंत्री नियुक्तीत स्थानिक राजकीय समीकरणे, मंत्र्यांचे कार्यक्षेत्र आणि तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधित्वाचा विचार करून जबाबदाऱ्या ठरविण्यात येत आहेत. काही महत्त्वाचे जिल्हे, विशेषतः रायगड, पुणे, आणि संभाजीनगर यांसाठी अजूनही चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या विषयावर लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे समजते.(Guardian Ministers list Maharashtra 2025)
पालकमंत्र्यांच्या (Guardian Minister) नियुक्तीनंतर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा सरकारचा उद्देश आहे.प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी नेतृत्व मिळावे, यासाठी योग्य मंत्र्यांची निवड करण्यावर भर दिला जात आहे.(Palak Mantri 2025 maharashtra)
जनतेचे लक्ष पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांकडे लागले आहे. पालकमंत्री (Guardian Minister) पदांवर एकमत झाल्यानंतर दोन दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हास्तरावरील प्रशासनाला निश्चित दिशा मिळेल, असे मानले जात आहे.(palak mantri list maharashtra)
Palak Mantri of Maharashtra 2025 : महाराष्ट्रातील संभाव्य पालकमंत्री यादी
- ठाणे – एकनाथ शिंदे – ठाणे
- पुणे – अजित पवार – पुणे व बीड
- नागपुर – चंद्रशेखर बावनकुळे
- बीड – अजित पवार
- सांगली – शंभूराज देसाई – सांगली
- सातारा – छ. शिवेंद्रराजे भोसले
- छत्रपती संभाजी नगर – संजय सिरसाट किंवा अतुल सावे
- जळगाव – गुलाबराव पाटील (भाजप जळगाव जिल्हा आपल्याकडे घेण्याची शक्यता)
- यवतमाळ – संजय राठोड
- अहमदनगर (अहिल्यानगर) – डाॅ राधाकृष्ण विखे-पाटील
- कोल्हापूर – हसन मुश्रीफ
- अकोला – माणिकराव कोकाटे किंवा अकाश फुंडकर
- अमरावती – चंद्रकांत पाटील
- भंडारा – राष्ट्रवादी
- बुलढाणा – अकाश फुंडकर
- बुलढाणा – आकाश फुंडकर
- चंद्रपूर – नरहरी झिरवळ
- धाराशीव – धनंजय मुंडे
- धुळे – जयकुमार रावल
- गडचिरोली – भाजप
- गोंदिया – आदिती तटकरे
- हिंगोली – आशिष जैस्वाल
- लातूर – गिरीष महाजन
- मुंबई शहर – प्रताप सरनाईक
- मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
- नांदेड – आशिष शेलार
- नंदुरबार – अशोक ऊईके
- नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन
- पालघर – गणेश नाईक
- परभणी – मेघना बोर्डीकर
- रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे
- सिंधुदुर्ग- नितेश राणे
- रत्नागिरी – उदय सामंत
- सोलापूर – जयकुमार गोरे
- वर्धा – पंकज भोयर
- वाशिम – दत्तात्रय भरणे
- जालना – अतुल सावे
- लातूर – बाळासाहेब पाटील