- Advertisement -

अगं बाबो आता हे काय नवीनच : म्हणे अनिल देशमुखांविरोधात पुरावेच नाहीत 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटावर मोठा राडा सुरू आहे. रोज ऐकमेकांवर तुफान हल्लाबोल करण्यात राजकीय नेते दंग आहेत. कधी व्यक्तीगत तर कधी भष्ट्राचाराच्या तोफा डागून राज्यात धुराळा उडवून दिला जात आहे. असाच एक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करत मोठा धुराळा उडवून दिला होता. या प्रकरणात आता परमबीर सिंह यांनी बुधवारी नवा धमाका केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठाणे न्यायालय आणि मुंबईतील किला कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता.त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून परमबीर सिंह गायब आहेत. मात्र, आता सिंह यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याची माहिती मिळतेय. आपल्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. (No evidence against Anil Deshmukh, Parambir Singh’s affidavit to the Commission of Inquiry)

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे परमबीर सिंह यांनी पतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्याची पुष्टी सिंह यांच्या वकिलांनी केलीय. मागील सुनावणीवेळी सिंह यांच्याकडून हे प्रतिज्ञापत्र चौकशी आयोगाकडे सादर केल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचं गठन केलं आहे. आयोगाकडून सिंह यांच्याविरोधात अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, सिंह अद्याप एकाही सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत.

चौकशी आयोगाने सिंह यांच्यावर जूनमध्ये 5 हजार रुपये आणि दोन वेळा 25 हजार रुपये दंडही ठोठावला होता.परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.