MPSC Results: एमपीएससीच्या निकालात विनायक पाटील राज्यात प्रथम, तर मुलींमधून पूजा वंजारी राज्यात प्रथम !

MPSC Results : राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2022 चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या निकालात ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाने राज्यात बाजी मारली आहे. 622 गुण पटकावत विनायक नंदकुमार पाटील (Vinayak Nandkumar Patil) हा राज्यात प्रथम आला. तर पूजा वंजारी (Puja Vanjari) मुलींमधून राज्यात प्रथम आली आहे.

MPSC results Vinayak Patil won first rank in state, while among girls Puja Vanjari stood first in state, Shubham Patil, Ganesh Dighe,Sourabh Gavande, Dhananjay Bangar,

MPSC ने 2022 मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल गुरूवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला. या निकालात कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक नंदकुमार पाटील याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. मुलींमध्ये पुजा वंजारी प्रथम आली. तर मागासवर्गीय प्रवर्गातून धनंजय बांगर (Dhananjay Bangar) राज्यातून पहिला आला आहे. राज्यात धनंजय बांगर (608) हा दुसरा आला. तर सौरभ गावंदे (Sourabh Gavande) (608) याने तिसरा क्रमांक मिळवला. गणेश दत्तात्रय दिघे (Ganesh Dighe) (605) चौथा तर शुभम गणपती पाटील (603) पाचवा आला. (Shubham Patil)

राज्य मुख्य परीक्षा 2022 च्या निकालात यंदा कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारली. कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक पाटील यांनी 622 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला. उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी आणि तहसीलदार या संवर्गातील 623 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. 18 जानेवारी 2023 गुरुवारी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आला. या मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राहणाऱ्या विनायक पाटील याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्याला 622 गुण मिळाले तर धनंजय पाटील 608 गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये पहिली आलेली पूजा वंजारी हिला 570 गुण मिळाले. विनायक पाटील यांचे वडील शेती करतात. त्यांनी राज्यसेवेच्या दुसरा प्रयत्नात हे उल्लेखनीय यश मिळवले.पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली होती. त्याचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. संख्याशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली. त्यांच्या या यशानंतर त्यांच्या गावात जल्लोष करण्यात आला.

एमपीएससी परीक्षेचा निकाल आल्यानंतर आता पसंतीक्रमाची प्रक्रिया सुरु होणार आहे. २२ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल