National Bravery Award winner Ejaz Nadaf Story : धक्कादायक  :  राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ ! 

 

 

National Bravery Award winner Ejaz Nadaf Story | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनामुळे सगळ्या क्षेत्रावर कोरोनाची वक्रदृष्टी पडलीय आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेलेत. माणसांच्या जगण्याच्या संघर्षाच्या चितरकथा रोजच समोर येत आहेत. जगण्याची ही धडपड अनेकांच्या जीवनात मोठी कलाटणी देणारी ठरत आहे.अनेकांना आपला पेशा सोडून दुसरी नोकरी किंवा उद्योग किंवा मोलमजुरी सुरु करावी लागली आहे.त्यातच आता एका राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्याला पोटाची खळगी भरण्यासाठी थेट मोलमजुरी करावी लागत  असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

National Bravery Award winner Ejaz Nadaf Story | सन २०१८ साली नांदेड जिल्ह्याच्या अर्धापुर तालुक्यातील पार्डी गावात घडलेली एक घटना देशात गाजली होती. (In the year 2018, an incident took place in Pardi village in Ardhapur taluka of Nanded district.)

या घटनेत गावाजवळून वाहणाऱ्या नदीच्या बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार मुलींना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या होत्या. त्यावेळी एका १५ वर्षीय चिमुकल्याने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून चारपैकी दोघींचे प्राण वाचविले. एका मुलीचे प्रेत पाण्यातून बाहेर काढण्याचे काम केले होते. दोन मुलींचे प्राण वाचवण्याचा पराक्रम केला होता. यामुळे ही घटना अन तो चिमुकला देशात प्रकाशझोतात आले होते.

National Bravery Award winner Ejaz Nadaf Story
National Bravery Award winner Ejaz Nadaf Story

राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते या १५ वर्षीय चिमुकल्याला २०१८ साली केंद्र सरकारकडून  राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचे नाव आहे एजाज नदाफ. (The 15-year-old boy was honored with the National Child Bravery Award by the Central Government in 2018 at the hands of the President and the Prime Minister. His name is Ejaz Nadaf.)

National Bravery Award winner Ejaz Nadaf Story | आज तो १८ वर्षाचा झाला आहे. शौर्य पुरस्कारामुळे एजाजच्या व त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात मोठा बदल झाला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. कारण आजघडीला पार्डी गावात राहणारं एजाजचं कुटूंब अत्यंत हलाखीचं जिणं जगत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी एजाजला केळीच्या गाड़ीवर मजुरी करावी लागतेय. अत्यंत गरीब परिवारात जन्मलेल्या एजाज नदाफचे आई वडील हे शेतात मजुरी करून कसेबसे कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.

National Bravery Award winner Ejaz Nadaf Story
National Bravery Award winner Ejaz Nadaf Story

National Bravery Award winner Ejaz Nadaf Story | यंंदा बारावीत ८२ टक्के गुण घेऊन एजाज उत्तीर्ण झालाय. तो सध्या केळीच्या गाड्यावर काम करतो आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वी एजाज नदाफला घरकुल मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तेही मिळाले नाही.नोकरी देणार असल्याचे सांगण्यात आले होते पण पुढे काही कार्यवाही नाही. शासन प्रशासनाकडून आजवर केवळ आश्वासनांची खैरात झाली खरी पण प्रत्यक्षात एजाज व त्याच्या कुटुंबाच्या पदरात काहीच पडलं नाही!

National Bravery Award winner Ejaz Nadaf Story | एजाजच्या परिवाराकडे राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे प्रमाणपत्र ठेवण्यासाठी साधे कपाटही नाही. एजाज नदाफ आणि त्याचा परिवार शासनाच्या भरीव मदतीची वाट पाहत आहेत. शासनाने शौर्य पुरस्काराची इज्जत राखण्यासाठी तरी नदाफ कुटुंबाला न्याय देण्याची आवश्यकता आहे. शासन न्याय देईल का ? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार (National Child Bravery Award) मिळालेल्या एजाज नदाफला  पोलीस किंवा आर्मीत जाण्याची इच्छा आहे. एजाज बारावीत ८२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व खेळाडू आणि बालशौर्य पुरस्कार प्राप्त असलेल्यांना नोकरीत घेण्याचे प्रावधान आहे. एजाज नदाफनेही नोकरीचे स्वप्न रंगवले आहे. हे स्वप्न पुर्ण होण्याआधी तो मोलमजुरी करून गरिबीशी दोन हात करून लढत आहे. नोकरी मिळेल अशी अपेक्षा बाळगून सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या एजाजच्या स्वप्नांचा आवाज सरकार ऐकेल का ? हा खरा प्रश्न आहे.

National Bravery Award winner Ejaz Nadaf Story | मदत करेल तेव्हा करेल पण त्याआधी  समाजातील दानशुरांनी बालशौर्य पुरस्कार विजेत्यावर आलेली मजुरीची दुर्दैवी वेळ दुर करण्यासाठी मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे.त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याबरोबरच त्याच्या कुटूंबाला दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठीही मदत होणे आवश्यक आहे.