Mimicry of Sharad Pawar’s voice : हॅलो मी शरद पवार बोलतोय… मंत्रालयात पळापळ.. मग पुढे काय घडलं ? वाचा

मुंबईसह पुणे जिल्ह्यातूनही बोगस फोन कॉलचे प्रकरण आले उघडकीस

Mimicry of Sharad Pawar’s voice | जामखेेड टाईम्स वृत्तसेवा : ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) हा बंगला महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचं सत्ताकेंद्र आहे. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे हे निवासस्थान आहे. (Silver Oak is NCP Chief  Sharad Pawar’s residence in Mumbai) या ठिकाणावरून जेव्हा  देशाच्या कुठल्याही भागात फोन जातो तेव्हा अनेकांची भंबेरी उडते हे अवघा देश जानतो.

पवारांच्या पॉवरबाज खेळीने अनेक जण घायाळ होतात. मग पवारांची हीच पाॅवर अनेकांना हवीहवीशी वाटते. पवारांच्या याच जादूचा फायदा उठवण्यासाठी एका भामट्याने चक्क पवारांच्या आवाजाची नक्कल करत (Mimicry of Sharad Pawar’s voice) अख्खं मंत्रालय हादरून टाकल्याने पवारांचा सिल्वर ओक हा बंगला चर्चेत आला आहे.

तर झालं असं की, कुणीतरी अज्ञाताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा आवाज काढून थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन केला गेेेला. ( Mimicry of Sharad Pawar’s voice) फोन करणार्‍या व्यक्तीने ‘हॅलो मी शरद पवार बोलतोय सिल्वर ओकमधून’, असे सांगत अमुक व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, असे थेट फर्मान सोडले. खुद्द शरद पवार साहेब फोन करत आहेत, असा प्रकार कधी होत नाही. यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि चौकशीचे सत्र सुरु झाले. त्यानंतर चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आली.

Mimicry of Sharad Pawar’s voice| हा फोन कॉल शरद पवारांनी केलाच नव्हता हे स्पष्ट झाले. हा फोन बोगस असल्याचे उघडकीस आल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered at Gavdevi police station in Mumbai after a complaint was lodged by a senior officer.)

Sharad Pawar’s voice Mimicry : directly called the Chief Minister’s Office | मुंबईतील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यातील चाकणमधून पवारांच्या नावे केलेल्या बोगस फोन काॅलचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. त्याचे झाले असे की, शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून प्रतापराव वामन खंडेभारड यांच्याकडे पैश्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी प्रताप खांडेभारड यांनी चाकण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. धीरज धनाजी पठारे ( रा.यशवंत नगर, खराडी, पुणे ) व त्याचा एक अनोळखी साथीदार यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पठारे याने साथीदारांच्या मदतीने संगणक आणि इंटरनेटचा वापर करत थेट शरद पवार यांच्या घरचा नंबर इंटरनेट फोनसाठी वापरला आणि खांडेभराड यांच्याकडे पैशांची मागणी केली. इंटरनेटचा वापर झाल्याने मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. (Sharad Pawar’s voice Mimicry : directly called the Chief Minister’s Office)