corona patients increased in Jamkhed । जामखेडमध्ये गुरूवारी कोरोनाचे रुग्ण वाढले !

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात सोमवारी, मंगळवारी व बुधवारी सलग तीन दिवस थंडावलेला कोरोनाने गुरूवारी तालुक्याला मोठा दणका दिला आहे.

गुरूवारी जामखेड तालुक्यातील ५७४ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये साकत ०१, हळगाव ०१, व नान्नज ०१ अश्या तीन रूग्णांचा समावेश आहे.

तर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR तपासणी अहवालात जामखेड ०४, खर्डा ०९, भुतवडा ०१, वाकी ०१, जामवाडी ०३, जवळा ०२, शिऊर ०२, कुसडगाव ०३, नानेवाडी ०२, धोतरी ०१, बांधखडक ०६, सावरगाव ०१, नान्नज ०१, हळगाव ०१, साकत ०१, रत्नापुर ०१, जमदारवाडी ०१, फक्राबाद ०१, डोणगाव ०१ असे ४२ रूग्ण आढळून आले आहेत.

रॅपिड अँटीजेन चाचण्या व RTPCR अहवाल मिळून गुरूवारी दिवसभरात एकुण ४५ रूग्ण जामखेड तालुक्यात आढळून आले आहेत. तसेच गुरूवारी दिवसभरात आरोग्य विभागाने ५०२ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली.