Consumer Protection Council : सागर पवार यांची ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड

मिडीया सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  :  ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी काम करत असलेल्या  ग्राहक संरक्षण परिषदेच्या (Consumer Protection Council) मिडीया सेलवर जामखेड येथील रहिवासी असलेला व सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या सागर पवार या तरुणाची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

जामखेड येथील सागर पवार हा पत्रकारितेत सक्रीय असलेला एक धडपड्या तरूण आहे. सतत नावीन्याचा शोध घेत नवनवे प्रयोग सागर  करत असतो. त्याचबरोबर तो सामाजिक चळवळीतही सक्रीय आहे.

ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आवाज उठवून ग्राहकांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या ग्राहक संरक्षण परिषदेने (Consumer Protection Council) सागर पवार याची पुणे जिल्हा मिडीया सेलच्या अध्यक्षपदावर नेमणूक केली आहे.

(Consumer Protection Council) ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय सचिव अरविंद धुळेकर, तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील ढमाळ यांनी नुकतेच निवडीचे पत्र सागर पवार यांना प्रदान केले.  या निवडीचे अनेकांनी अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.