Lok Sabha Election Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणत्या तारखेला कुठे होणार मतदान ? जाणून घ्या सविस्तर !

Lok Sabha Election Maharashtra 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा आज (16 मार्च)केली. एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात देशात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कधी मतदान होणार जाणून घेऊयात. (Lok Sabha Election 2024 date)

Lok Sabha Election Maharashtra 2024, When will voting be held in 48 Lok Sabha constituencies of Maharashtra? Know in detail, Voting in Maharashtra on which date in which constituencies

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पाच टप्प्यात यासाठी मतदान पार पडणार आहे.19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे,13 मे, 20 मे 2024 या तारखांना महाराष्ट्रात लोकसभेसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान कधी ?

 • पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
 • दुसरा टप्पा 26 एप्रिल- बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
 • तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
 • चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
 • पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

‘मिथ वर्सेस रियालिटी’ अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.

असे असेल अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे वेळापत्रक

 • 18 एप्रिल रोजी नोटीफिकेशन
 • 25 एप्रिल रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख
 • 26 एप्रिल रोजी छाननी
 • 29 एप्रिल रोजी फॉर्म माघारी घेण्याचा दिवस
 • 13 मे रोजी मतदान
 • 4 जून रोजी मतमोजणी